यवतेश्वर घाटातील दरीत मुलीचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 16:24 IST2021-04-14T16:21:20+5:302021-04-14T16:24:15+5:30
Crimenews satara : सातारा - कास मार्गावरील यवतेश्वर घाटात बुधवारी सकाळी संभाजीनगर येथील बेपत्ता असलेल्या युवतीचा खोल दरीत मृतदेह सापडल्याची घटना घडली. सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांना याची माहिती समजताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह दरीत दोनशे, डीचशे फूट खोल असल्याने ट्रेकर्सद्वारे मृतदेह खोल दरीतून वर काढण्यात आला.

यवतेश्वर घाटातील दरीत मुलीचा मृतदेह आढळला
पेट्री/सातारा : सातारा - कास मार्गावरील यवतेश्वर घाटात बुधवारी सकाळी संभाजीनगर येथील बेपत्ता असलेल्या युवतीचा खोल दरीत मृतदेह सापडल्याची घटना घडली. सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांना याची माहिती समजताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह दरीत दोनशे, डीचशे फूट खोल असल्याने ट्रेकर्सद्वारे मृतदेह खोल दरीतून वर काढण्यात आला.
यवतेश्वर घाटातील कठडयावर बॅग आढळून आली. या बॅगेत असलेल्या आधारकार्डावरील माहितीनुसार दरूज (ता.खटाव ) येथील शीतल नितीन पाटोळे ( वय-१७) असे या युवतीचे नाव आहे. ही युवती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस काही दिवसांपूर्वी झाली होती. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण समजू शकणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.