शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Satara: पळशी येथे नीरा-देवधर कालव्यात आढळला मृतदेह; घातपाताची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 13:43 IST

पळशी ग्रामपंचायत अधिकारी संपर्काबाहेर

शिरवळ : पळशी गावच्या हद्दीत असणाऱ्या नीरा देवघर कॅनॉलच्या पाण्यात अंदाजे ३५ ते ४० वर्षीय युवकाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला आहे. दरम्यान, संबंधित युवकाचा घातपात आहे की आत्महत्या याबाबत शिरवळ पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शिंदेवाडी परिसरात असणाऱ्या नीरा देवघर कालव्यातील पाण्यामध्ये मृतदेह पाण्यात तरंगत असल्याची माहिती शिरवळ पोलिसांना शनिवार, ७ रोजी मिळाली. त्यानुसार शिरवळचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव शिद, पोलिस उपनिरीक्षक शंकर पांगारे, सतीश आंदेलवार, पोलिस अंमलदार सुरेश मोरे, विजय शिंदे, अजय झुंजार, संजय केंगले, गृहरक्षक दलाचे जवान व शिरवळ रेस्क्यू टिमच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली.पाण्याचा प्रवाह व झाडे-झुडपे तसेच अंधार पडल्याने शोधकार्यात अडथळा निर्माण होत होता. यावेळी रविवारी शिरवळ पोलिसांनी शिरवळ रेस्क्यू टीमच्या सहकार्याने शोधमोहीम राबविली असता पळशी गावच्या हद्दीत नीरा देवघर कालव्याच्या पाण्याच्या प्रवाहात अंदाजे सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या वेळी शिरवळ ग्रामपंचायतच्या रुग्णवाहिकेच्या सहकार्याने मृतदेह शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणत शवविच्छेदन करण्यात आले.

दरम्यान, संबंधित युवकाचा घातपात असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून त्यादृष्टीने शिरवळ पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. या घटनेची पळशी पोलीस पाटील प्रिया दगडे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार तपास करीत आहे.

पळशी ग्रामपंचायत अधिकारी संपर्काबाहेरपळशी येथे सडलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळल्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत शिरवळ पोलिस तसेच पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी पळशी ग्रामपंचायत अधिकारी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यावेळी तहसीलदार सुहास थोरात, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर मृतदेहाबाबत सकारात्मक पर्याय रात्री उशिरा निघाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Body found in canal; murder suspected in Palashi.

Web Summary : A decomposed body of a young man was found in the Neera Devghar canal near Palashi. Police suspect foul play and are investigating the death as a possible murder. The body has been sent for post-mortem.