Body found in grandson at Karanje, suspicion of murder: Police are working to identify him | करंजे येथे पोत्यात मृतदेह आढळला, खुनाचा संशय

करंजे येथे पोत्यात मृतदेह आढळला, खुनाचा संशय

ठळक मुद्देकरंजे येथे पोत्यात मृतदेह आढळला, खुनाचा संशय पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू

सातारा : येथील करंजेमधील कोमठी चौकात एका पन्नास वर्षीय पुरुषाचा पोत्यामध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडालीय. संबंधित व्यक्तीचा खून झाल्याचा संशय व्यक्त होत असून, पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, करंजेमधील कोमठी चौकामध्ये एका लक्झरी बसजवळ पोते असून, त्या पोत्यामधून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याची माहिती काही नागरिकांनी रविवारी दुपारी शाहूपुरी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता पोत्यामध्ये मृतदेह आढळून आला.

संबंधित व्यक्तीचा चेहरा छिन्नविच्छिंन अन् रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत होता. पोलिसांना मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. जोपर्यंत शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होत नाही. तोपर्यंत हा खून की अपघात आहे, हे समोर येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत संबंधित व्यक्तीची ओळख पटली नव्हती. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर हे अधिक तपास करत आहेत.

Web Title: Body found in grandson at Karanje, suspicion of murder: Police are working to identify him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.