नितीन काळेलसातारा : जिल्ह्यातील ११ पंचायत समितींच्या सभापती आणि उपसभापतिपदाची निवडणूक १६ मार्च रोजी होत असून सर्वत्रच महायुतीचीच सत्ता येणार, हे मात्र नक्की आहे. यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी स्वबळावर प्रत्येकी तीन पंचायत समितीत सत्ता आणू शकते. तर शिंदेसेनेला पाटणमध्ये झेंडा फडकवता येणार आहे. पण, चार ठिकाणी चिठ्ठी किंवा राजकीय जुळवाजुळवीचा निर्णय होणार असल्यामुळे राजकीय खेळीकडे लक्ष लागून राहणार आहे.जिल्ह्यातील पंचायत समितीची निवडणूक तब्बल नऊ वर्षांनी पार पडली. आता सोमवार, दि. १६ मार्च रोजी त्या-त्या तालुक्यात सभापती आणि उपसभापतिपदाची निवडणूक होत आहे. जिल्ह्यात महायुती अंतर्गतच सर्वच पंचायत समितीत सत्ता स्थापन होणार आहे. यामध्ये भाजपच मोठा भाऊ ठरण्याची शक्यता आहे. खटाव, सातारा आणि कराडमध्ये भाजपचाच सभापती होईल.याठिकाणी भाजपला कोणाच्या कुबड्याची गरज लागणार नाही. त्यामुळे स्वबळावर भाजप सत्ता स्थापन करू शकते. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षालाही खंडाळा, कोरेगाव आणि वाई पंचायत समितीत सत्ता मिळू शकते. तर शिंदेसेनेला पाटणमध्ये एकहाती आणि मोठ्या बहुसंख्येने सभापतिपद मिळणार आहे. या ७ पंचायत समितींच्या सत्ताकारणात अधिक करून फाटाफूट होण्याची शक्यता कमीच आहे.
‘ऑपरेशन लोटस’ची धास्ती...जिल्ह्यातील ७ पंचायत समितीतील सत्ता समीकरणे स्पष्ट असलीतरी माण, फलटण, महाबळेश्वर आणि जावळीतील चित्र निश्चित नाही. माणमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीलाही समसमान म्हणजे १० पैकी प्रत्येकी ५ जागा मिळाल्या आहेत. फलटणला १६ पैकी भाजपला ५ आणि त्यांच्याबरोबर युती केलेल्या राष्ट्रवादीला ३ जागा जिंकता आल्यात. तर शिंदेसेनेने स्वबळावर ८ जागा पदरात पाडून घेतल्या. याठिकाणी भाजपबरोबर राष्ट्रवादी जाऊ शकते. त्यामुळे येथील कल हा निवडीच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.या दोन्ही पंचायत समितीत चिठ्ठीचा प्रयाेग होणार की, ‘ऑपरेशन लोटस’चा विजय अन्यथा काय घडामोडी होणार हे त्याचदिवशी समजणार आहे. जावळी पंचायत समितीत भाजपला ३ तर शिंदेसेना २ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला एका जागेवर समाधान मानावे लागले. येथे शिंदेसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊ शकते. मग, ईश्वरचिठ्ठी की आणखी वेगळी राजकीय खेळी यावर येथील सभापतीची निवड अवलंबून आहे. महाबळेश्वरला शिंदेसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी २ सदस्य आहेत. त्यामुळे सत्ता वाटून घेणार की, चिठ्ठीद्वारे सत्ता स्थापन करणार यावरून सध्या चर्चा सुरू झालेली आहे.
माण, जावळी, फलटणमध्ये दिग्गजांच्या नेतृत्वाचा कस...माण तालुक्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. तालुक्यातील पंचायत समितीच्या १० पैकी ५-५ गणांत भाजप आणि राष्ट्रवादीचे सदस्य झाले आहेत. येथे चिठ्ठीद्वारे सभापती निवड होण्याचीच अधिक शक्यता आहे. जावळीतही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलेले आहे. फलटणला ‘राजे’ गटाने ताकदीने खिंड लढविली. पण, शिंदेसेनेला बहुमतासाठी एक जागा कमी पडली. आता येथेही ‘राजे’ गटाचा कस लागला आहे. आता राजकीय खेळींकडेच लक्ष लागून राहिलेले आहे.
Web Summary : BJP and NCP compete for power in Satara Panchayat Samitis. Alliances will determine who dominates, with some seats decided by lottery or political maneuvering.
Web Summary : सतारा पंचायत समितियों में भाजपा और राकांपा सत्ता के लिए प्रतिस्पर्धा कर रही हैं। गठबंधन यह निर्धारित करेंगे कि कौन हावी है, कुछ सीटें लॉटरी या राजनीतिक पैंतरेबाजी द्वारा तय की जाएंगी।