शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

भाजप खासदारांचा राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांच्या गाडीतून प्रवास, जवळीकतेची जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 12:17 IST

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच पक्षात ताणाताणी सुरू आहे. त्यातच विधानपरिषदेची निवडणूक होऊ घातली असल्याने वातावरण भलतेच तापले आहे

प्रमोद सुकरेक-हाड : नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच पक्षात ताणाताणी सुरू आहे. त्यातच विधानपरिषदेची  निवडणूक होऊ घातली असल्याने वातावरण भलतेच तापले आहे. सर्वच पक्षांतून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत, अशी परिस्थिती एकीकडे असताना, दुसरीकडे मात्र बुधवारी कऱ्हाडात भाजपचे खासदार संजय पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांच्या गाडीतून एकत्रित कार्यक्रमाला प्रवास करताना दिसून आले. त्याची चर्चा झाली नाही तर नवलच!सध्या राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार कार्यरत आहे. पण या आघाडीत सगळेच आलबेल आहे, असे मात्र नक्कीच नाही. या बिघाडीचे प्रत्यंतर नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीतही पाहायला मिळाले. आता विधानपरिषद निवडणूक होऊ घातली आहे. भाजपने एक उमेदवार जादा रिंगणात उतरवित रंगत वाढविली आहे. त्यामुळे सगळ्याच पक्षांमध्ये अविश्वासाचे निर्माण झालेले दिसते. त्यामुळे वातावरण तणावपूर्णच आहे.पण बुधवारी कऱ्हाडात मात्र हा तणाव कुठेच दिसला नाही. कारण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील एका खासगी दौऱ्यासाठी विमानाने दुपारी कऱ्हाडात पोहोचले. तेव्हा त्यांच्या स्वागताला चक्क भाजपचे खासदार संजय पाटील उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ते प्रशांत यादव, लालासाहेब पाटील, पोपटराव साळुंखे, पांडुरंग चव्हाण, गंगाधर जाधव, सौरभ पाटील, वैभव हिंगमिरे आदींनी जयंत पाटील यांचे स्वागत केले. त्यानंतर मंत्री पाटील यांनी खासदार संजय पाटील यांना गाडीत बसायला सांगितले अन् ते दोघेच गाडीत बसून पुढे निघून गेले. आता या दोघांमध्ये नेमके काय गुफ्तगू झाले, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

काँग्रेस ते भाजप व्हाया राष्ट्रवादी...

  • मंत्री जयंत पाटील व खा. संजय पाटील यांचे तालुके सांगली जिल्ह्यात एकमेकांच्या शिवधडीला लागून आहेत अन् संजय पाटलांचा राजकीय प्रवास पाहिला तर तो काँग्रेस ते भाजप असला तरी, तो व्हाया राष्ट्रवादी झाला आहे.
  • जयंत पाटलांचा आणि खासदार संजय पाटील यांचा यापूर्वी खांद्याला खांदा लागला आहेच. पण तरीही बुधवारी वाळवा अन् तासगावकरांच्या जवळीकतेची कहाडसह सातारा जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु होती. 

चाय पे चर्चामंत्री जयंत पाटील व खासदार संजय पाटील यांनी विमानतळावरील विश्रामगृहात चहा पिताना चर्चाही केली. आता ही चर्चा नेमकी काय झाली, हे नेमके माहीत नाही. मात्र, त्या दोघांनी पिलेला चहा 'काळा' होता बरं!

टॅग्स :Satara areaसातारा परिसरJayant Patilजयंत पाटीलBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस