शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याचं ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बँटींग, दुसरी बँटींग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
4
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
5
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
6
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
7
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
8
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
9
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
10
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
11
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
12
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
13
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
14
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
15
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
16
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
17
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
18
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
19
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
20
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 

भाजप गटनेत्याने उगारले नगरसेवकावर पिस्तूल-सातारा पालिकेच्या पार्टी मीटिंगमध्ये राडा : तीन कोटीच्या निधीवरून हमरातुमरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 11:48 PM

सातारा : सातारा शहराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून आलेल्या तीन कोटी निधीच्या वाटपावरून मंगळवारी भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार राडा झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की,

ठळक मुद्देसंतप्त पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत

सातारा : सातारा शहराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून आलेल्या तीन कोटी निधीच्या वाटपावरून मंगळवारी भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार राडा झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, गटनेत्यांकडून पक्षाचेच नगरसेवक व जिल्हा सरचिटणीस यांच्यावर पिस्तूल रोखण्यात आल्याचा प्रकार घडला. दरम्यान, या घटनेने नाराज झालेले काही नगरसेवक बुधवारी मुंबईला रवाना होणार असून, ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.पालिकेत मंगळवारी भाजप नगरसेवकांची कमराबंद बैठक पार पडली. या बैठकीला सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या. प्रारंभी विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर शहर विकासासाठी नगरसेवकांना आलेल्या तीन कोटींच्या निधीचा मुद्दा चर्चेला आला. या निधीतूून सर्वसमावेशक कामे करावीत, सर्वांना समान निधी मिळावा, कामांचे योग्य नियोजन करावे, अशा सूचना नगरसेवकांनी मांडल्या. निधी वाटपावरून खलबते सुरू झाली.सर्व नगरसेवकांचा रोष गटनेत्यांकडे असल्याने सर्वांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. अखेर बाचाबाचीतून हा विषय थेट विकोपाला गेला. संतप्त झालेल्या गटनेत्यांनी सहकारी नगरसेवकांना एकेरी भाषा वापरली. यानंतर भाजप सरचिटणीस अधिकारवाणीने बोलू लागताच दोघांमध्ये हमरातुमरी व धक्काबुक्कीही झाली.त्यानंतर आक्रमक गटनेत्यांनी चक्क स्वत:कडील पिस्तूलच आपल्या सहकारी नगरसेवकावर रोखल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या सर्व प्रकारामुळे बैठकीत तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर सहकाऱ्यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटविण्यात आला. यानंतर सायंकाळी भाजप जिल्हा परिषद सदस्यांच्या निवासस्थानी घडलेल्या प्रकाराबाबत पुन्हा बैठक झाली. या बैठकीत सर्वांची समजूूत काढण्यात आली. तोडगा न निघाल्याने नाराज नगरसेवक बुधवारी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार आहेत.मंगळवारच्या पार्टी मीटिंगमध्ये निधी वाटपावरून तात्विक वाद झाला असला तरी मी कोणतीही मर्यादा ओलांडली नाही. पिस्तूल रोखण्याचा प्रकार घडला नाही.- धनंजय जांभळे, गटनेताभाजपमध्ये आजपर्यंत कधीच दंडेलशाहीसारखा प्रकार घडला नाही.मात्र, मंगळवारी जे घडले, ते अत्यंत धक्कादायक अन् पक्षासाठी धोकादायक आहे.- विजय काटवटे, नगरसेवक

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrimeगुन्हा