शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

माढा अन् सोलापूरमध्ये भाजपचा जयकुमार गोरे यांच्यामुळेच पराभव, अभयसिंह जगताप यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 13:51 IST

जयकुमार गोरे यांनी गैरव्यवहारातून १४ गाड्या घेतल्याचा आरोप

दहीवडी : आमदार जयकुमार गोरे यांनी घेतलेल्या आलिशान १४ चारचाकी गाड्या ह्या ठेका आणि इतर कामांच्या कमिशनमधून व मृत व्यक्तींना जिवंत दाखवून कमावलेल्या करोड रुपयांच्या माध्यमातून घेतलेल्या आहेत. माढा आणि सोलापूरमध्ये भाजपचा जयकुमार गोरे यांच्यामुळेच पराभव झाला आहे,’ असा आरोप अभयसिंह जगताप यांनी केला आहे.दहीवडी येथील शासकीय विश्रामगृहात सोमवार आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अभयसिंह जगताप म्हणाले, ‘आमदार गोरे सांगतात की, माझ्याकडे १४ चारचाकी गाडी आहेत. त्या गाड्या त्यांच्या नावावर आहेत का? त्या गाड्या मेलेल्या माणसाच्या नावांवर पैसे काढून, कॉन्ट्रॅक्टरकडून कमिशन घेऊन, इतर अन्य अवैध कामाच्या भ्रष्टाचारातून घेतलेल्या आहेत हे माण खटावच्या संपूर्ण जनतेला माहीत आहे. मी घेतलेली गाडी ही स्वतःच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये कोणाच्याही पापाचा एक रुपया नाही. मी सरकारला कायदेशीररीत्या इन्कमटॅक्स भरतो. मी इच्छापूर्ती म्हणून गाडी घेतलेली नाही. गेल्या महिन्यामध्ये माझ्या गाडीचा लोणंद फलटण महामार्गावर अपघात झाला होता. त्यामध्ये माझा जीव वाचला व माझ्या गाडीचे प्रचंड नुकसान झाले होते म्हणून मी दुसरी गाडी स्वतःच्या संरक्षणासाठी घेतली, याचे आमदार गोरे यांना वाईट वाटले की, त्यांना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये सांगण्याची वेळ आली. जयकुमार गोरे यांनी २०१९ च्या निवडणुकी वेळी प्रतिज्ञापत्र जमा केले. त्यानुसार २०१५ चे उत्पन्न २२ लाख दाखविले. २०१७ ला ३३ लाख ९६ हजार, २०१८ चा ३९ लाख ९१ हजार रुपये दाखविले आहे. एवढ्या साऱ्या उत्पन्नाची बेरीज केली तरी एक आलिशान गाडी येऊ शकत नाही. त्यामुळे आमदार गोरे यांनी घेतल्यात १४ गाड्या ह्या गैरव्यवहाराच्या पैशाच्याच आहेत.मायणी मेडिकल कॉलेजमध्ये कोविड सेंटर उभा करून शेकडो मृत व्यक्तींना जिवंत दाखवून मागासवर्गीय मृत व्यक्तीची जमीन नावावर करून घेऊन करोडो रुपये कमावले. त्यातून आलिशान गाड्या घेऊन तुम्ही फिरता. आम्ही वरकुटे मलवडी येथे स्वखर्चातून कोरोना सेंटर उभा करून विनामूल्य सेवा करून अनेकांना जीवनदान दिले. आम्ही पुण्य कमावले आहे तुम्ही पापाचे घडे भरलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या तीन महिन्यांत जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल असे वक्तव्यदेखील अभयसिंह जगताप यांनी केले.

तर ग्रामपंचायतीलाही निवडून येणार नाहीतमाढा लोकसभेला माण-खटावमधून २३ हजारांचे मताधिक्य कोट्यवधी रुपये वाटून मिळाले आहे. आमदार गोरे यांनी पैसे नाही वाटले तर ग्रामपंचायत ही जिंकता येणार नाही पण राष्ट्रवादीला मिळालेले मतदान हे कोणालाही पैसे न वाटता प्रेमाने मिळालेले आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmadha-acमाढाSolapurसोलापूरJaykumar Goreजयकुमार गोरेBJPभाजपा