पिसाळलेल्या कुत्र्याकडून सहाजणांना चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 14:59 IST2019-02-08T14:57:24+5:302019-02-08T14:59:07+5:30

सातारा येथील मोरे कॉलनीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला असून, सहाजणांना कुत्र्याने चावा घेतला आहे. जखमी झालेल्या रुग्णांवर साताऱ्यातील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरूवारी सायंकाळी घडली.

Bite a six-year-old dog | पिसाळलेल्या कुत्र्याकडून सहाजणांना चावा

पिसाळलेल्या कुत्र्याकडून सहाजणांना चावा

ठळक मुद्देपिसाळलेल्या कुत्र्याकडून सहाजणांना चावासाताऱ्यातील खासगी दवाखान्यात उपचार सुरू

सातारा: येथील मोरे कॉलनीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला असून, सहाजणांना कुत्र्याने चावा घेतला आहे. जखमी झालेल्या रुग्णांवर साताऱ्यातील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरूवारी सायंकाळी घडली.

राजवाड्यापासून जवळच मोरे कॉलनी आहे. या कॉलनीमध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरश: धुमाकूळ घातला. वाटेत दिसेल त्याला चावा घेत कुत्रे कॉलनीमध्ये इकडून तिकडे फिरत होते. त्यामुळे नागरिकांनी या कुत्र्यांचा चांगलाच धसका घेतला.

काही नागरिकांनी भितीने दरवाजा बंद करून घेतले. नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना या प्रकाराची माहिती देण्यात आली. परंतु कोणीच कॉलनीमध्ये फिरकले गेले नसल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले.

Web Title: Bite a six-year-old dog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.