बिग बॉसचे बॉउन्सर साताऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 12:58 IST2019-07-29T12:54:53+5:302019-07-29T12:58:28+5:30

बिग बॉसमधून अटक केलेल्या अभिजित बिचुकलेची शनिवारी दुपारी साडेचार वाजता कोल्हापूर येथील कळंबा कारागृहातून सुटका करण्यात आली. दरम्यान, बिग बॉसमधील बॉउन्सर त्याला नेण्यासाठी साताऱ्यात आले असून, त्याला मुंबईला नेले जाणार आहे, अशी माहिती अ‍ॅड. श्रीकांत हुटगीकर यांनी दिली.

Big Boss Bouncer in the Seventies | बिग बॉसचे बॉउन्सर साताऱ्यात

बिग बॉसचे बॉउन्सर साताऱ्यात

ठळक मुद्देअभिजित बिचुकलेची कळंबा कारागृहातून सुटका बिचुकलेच्या वकिलांची माहिती

सातारा : बिग बॉसमधून अटक केलेल्या अभिजित बिचुकलेची शनिवारी दुपारी साडेचार वाजता कोल्हापूर येथील कळंबा कारागृहातून सुटका करण्यात आली. दरम्यान, बिग बॉसमधील बॉउन्सर त्याला नेण्यासाठी साताऱ्यात आले असून, त्याला मुंबईला नेले जाणार आहे, अशी माहिती अ‍ॅड. श्रीकांत हुटगीकर यांनी दिली.

अभिजित बिचुकलेवर शासकीय कामात अडथळा आणणे तसेच चेक बाऊंस, खंडणी असे तीन गुन्हे दाखल होते. खंडणीच्या गुन्ह्यातील फिर्यादिने तक्रार मागे घेतल्याने बिचुकलेची या गुन्ह्यात निर्दोष मुक्तता झाली. उर्वरित दोन्ही गुन्ह्यांमध्येही त्याला जामीन मिळाला होता.

शनिवारी दुपारी त्याची सुटका झाल्याने त्याला आणण्यासाठी त्याची पत्नी आणि अन्य नातेवाईक कोल्हापूरला रवाना झाले होते. शनिवारी दुपारी साडेचार वाजता बिचुकलेची कळंबा कारागृहातून सुटका करण्यात आली. त्यानंतर त्याला खासगी गाडीने साताऱ्यात आणण्यात आले.

अभिजित बिचुकलेला जामीन मंजूर झाल्याचे समजताच बिग बॉसमधील अनेकजण बिचुकलेचे वकील श्रीकांत हुटगीकर यांच्या संपर्कात होते. त्याला मुंबईला नेण्यासाठी आम्ही सातारला येत आहोत, असे त्यांनी सांगितले. त्यानुसार शनिवारी रात्री उशिरा बिग बॉसमधील बाउंन्सर बिचुकलेला नेण्यासाठी साताऱ्यात आले.

Web Title: Big Boss Bouncer in the Seventies