शहरं
Join us  
Trending Stories
1
तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : ससूनची दीनानाथ रुग्णालयासह डॉ. घैसास यांना ‘क्लीन चिट’
2
अजितदादा-शरद पवार एकत्र येण्यासाठी पांडुरंगाच्या चरणी साकडे घातले का? सुनील तटकरे म्हणाले...
3
देवेंद्र फडणवीसांच्या विधानसभा २०२४ च्या विजयाला आव्हान; हायकोर्टाने समन्स बजावले
4
VIDEO: परप्रांतीय विक्रेत्याने गटारात धुतले ताडगोळे; खेडमधील किळसवाणा प्रकार
5
...तर अमेरिकनांचा इन्कम टॅक्स कायमचा बंद होईल; टेरिफ वॉरवरून ट्रम्पनी स्वत:चीच पाठ थोपटून घेतली
6
वक्फ कायद्यात एक जरी चूक निघाली तरी खासदारकीचा राजीनामा देणार; जेपीसी अध्यक्षांची मोठी घोषणा
7
भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाने शोधला एलियन्सचं वास्तव्य असलेला ग्रह, संशोधनानंतर केला दावा
8
“जनतेला फसवणाऱ्या महायुती सरकारविरोधात लढाई तीव्र करणार”; मुंबई बैठकीत काँग्रेसचा निर्धार
9
महेश मांजरेकरांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर; मुक्ता बर्वे, काजोलचाही होणार सन्मान
10
Waqf Law: नव्या वक्फ कायद्यातील दोन तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; सरकारकडून मागितलं उत्तर
11
"....म्हणून मी तिला देणार नाही घटस्फोट’’,  होणाऱ्या जावयासोबत पळाळेल्या महिलेच्या पतीनं सांगितलं कारण
12
कोकणची राणी होत Ratnagiri Jets मधून नव्या प्रवासाला निघाली स्मृती मानधना
13
मोठ्या पडद्यावर ब्लॉकबस्टर, ओटीटीवर सुपरफ्लॉप; 'छावा'ची नेटफ्लिक्सवर वाईट अवस्था
14
स्वारगेट प्रकरणात मोठी अपडेट..! आरोपी दत्ता गाडेविरोधात 893 पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
15
५० कोटींचा 'तो' श्वान निघाला भारतीय जातीचा; ईडीने धाड टाकल्यावर मालकाने सगळेच सांगितले
16
उदयनराजे, उद्धव ठाकरेंच्या मागणीला संभाजीराजेंचे समर्थन; म्हणाले, “किल्ल्यांचे जतनही व्हावे”
17
जमिनीवर भिंतीवर आपटले, मन भरलं नाही म्हणून दगडाने ठेचले; श्वान प्रेमीने केली पाच पिल्लांची हत्या
18
रात्रीच्या जेवणात चुकूनही खाऊ नका 'या' ३ गोष्टी; सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टचा मोलाचा सल्ला
19
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सच्या संघात 'मारिया शारापोवा'; MS Dhoni शी आहे खास कनेक्शन
20
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक, म्हणाले. "आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या…’’, 

साताऱ्यातील भांबवली वजराई धबधबा हंगाम आजपासून सुरू, देशातील सर्वाधिक उंचीचा धबधबा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 12:49 IST

हिरव्यागर्द झाडीतील धुवाँधार पावसाचा व धबधब्याचा थ्रिलिंग अनुभव घेण्यासाठी पर्यटक भांबवली वजराई धबधब्याला भेट देतात

पेट्री : शहराच्या पश्चिमेस मागील दोन आठवड्यांपासून पावसाने अधूनमधून दमदार हजेरी लावली आहे. पाऊस संततधार सुरू असल्याने छोटे-मोठे धबधबे फेसाळू लागले आहेत. पर्यटकांचे लक्ष वेधणारा भारतातील सर्वाधिक उंचीचा भांबवली वजराई धबधब्याचा हंगाम शुक्रवारपासून सुरू होणार असल्याने पर्यटकांमध्ये आनंद, उत्साहाचे वातावरण आहे.देशातील सर्वाधिक उंचीचा भांबवली वजराई धबधबा आता पर्यटन विकासासाठी सज्ज झाला आहे. परिसर डोंगराळ असून, घनदाट झाडीचा असल्यामुळे पर्यटकांना चालताना कसरत करावी लागते. विशेष करून वयस्कर पर्यटकांची मागणी होती की चालण्यासाठी सोयीस्कर पायवाट व्हावी. जांभ्या दगडाची पायवाट झाली आहे.पर्यटक हिरव्यागर्द झाडीतील धुवाँधार पावसाचा व धबधब्याचा थ्रिलिंग अनुभव घेण्यासाठी जुलै, ऑगस्ट महिन्यांत भांबवली वजराई धबधब्याला भेट देतात. भांबवलीतील सध्याचे वातावरण मनमोहक असून, धुवाँधार पावसाच्या सरी, गार-गार वारा, रानकिड्यांचे आवाज, हिरवी गर्द झाडी, धबधब्याच्या पाण्याचा प्रचंड प्रपात, निसर्गाचा खुललेला नजारा पाहून मन प्रफुल्लित होत आहे.

विकास काम सुरूभांबवली वजराई धबधब्याला २०१८ मध्ये ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून मान्यता मिळून धबधब्याच्या विकासाचे काम सुरू झाले. घनदाट जंगल, दुर्गम डोंगरातून जाताना पर्यटकांना कसरत करावी लागायची. पहिल्या टप्प्यातील पायऱ्या, रेलिंगच्या कामामुळे डोंगरातून घसरगुंडीची समस्या दूर झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात वाॅच टाॅवर व पॅगोडाचे काम झाले असून, निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येत आहे. तिसऱ्या टप्प्यातील बांबू (गेस्ट) हाऊसचे काम पूर्ण झाले असून, पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा आनंद मिळेल.

पांढऱ्या शुभ्र पाण्याचा प्रपात जणू काही दुधाळ धबधबा.. काळ्याकुट्ट दगडावरील, हिरव्यागर्द झाडीतील धबधब्याची विहंगम नजारा पाहायला निसर्गप्रेमी पर्यटकांच्या नजरा आसुसलेल्या असतात. सर्वांच्या मार्गदर्शनाखाली, सहकार्यातून भांबवली वजराई धबधबा प्रमुख, आकर्षक पर्यटनस्थळ होण्याच्या मार्गावर आहे. पर्यटकांनी या हंगामात भांबवलीला जरूर भेट देऊन निसर्गाचा मनमुराद आनंद लुटावा. - रवींद्र मोरे, पर्यटनप्रमुख, भांबवली

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसtourismपर्यटन