सातारा पालिका : घंटागाड्या बंद.. कचरा घरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 16:46 IST2021-05-28T16:44:02+5:302021-05-28T16:46:40+5:30

Muncipal Corporation Satara : दोन महिन्यांचे वेतन ठेकेदाराकडून अदा करण्यात न आल्याने सातारा पालिकेच्या ३० घंटागाडीचालक व सहायकांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन केले. या आंदोलनामुळे सुमारे ३० टन कचरा हा घरातच पडून राहिला. जोपर्यंत वेतन अदा केले जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा घंटागाडी चालकांनी दिला आहे.

Bells closed .. trash in the house! | सातारा पालिका : घंटागाड्या बंद.. कचरा घरात!

सातारा पालिका : घंटागाड्या बंद.. कचरा घरात!

ठळक मुद्दे सातारा पालिका : घंटागाड्या बंद.. कचरा घरात!ठेकेदाराने वेतन रखडवल्याने कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

सातारा : दोन महिन्यांचे वेतन ठेकेदाराकडून अदा करण्यात न आल्याने सातारा पालिकेच्या ३० घंटागाडीचालक व सहायकांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन केले. या आंदोलनामुळे सुमारे ३० टन कचरा हा घरातच पडून राहिला. जोपर्यंत वेतन अदा केले जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा घंटागाडी चालकांनी दिला आहे.

सातारा पालिकेने चाळीस घंटागाड्या खरेदी केल्या असून, त्या एका खासगी ठेकेदारामार्फत चालविल्या जातात. ४० पैकी ३० घंटागाड्यांचा ठेका पुणे येथील एका खासगी कंपनीने घेतलेला आहे. प्रत्येक घंटागाडीवर चालक व सहायक असे दोन कर्मचारी काम करतात. चालकाला प्रतिमहा आठ तर सहायकाला सात हजार रुपये मानधन ठेकेदाराकडून दिले जाते.

संचारबंदी मुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेकांची रोजीरोटी थांबली आहे. अशा परिस्थितीत ठेकेदाराकडून कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे बिल अद्याप अदा केले नाही. वारंवार सांगूनही ही बाब गांभीर्याने घेतली जात नसल्याचा आरोप करत घंटागाडी संघटनेने शुक्रवारी कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला.

साताऱ्यातील हुतात्मा स्मारक येथे सर्व घंटागाड्या लावण्यात आल्या. या आंदोलनाची माहिती मिळताच संबंधित कंपनीचे व्यवस्थापक अभिजीत ढाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. येत्या काही दिवसात कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केले जाईल असे त्यांनी सांगितले. मात्र कर्मचारी आपल्या मतावर ठाम होते.

जोपर्यंत दोन महिन्यांचे मानधन मिळत नाही तोपर्यंत घंटागाडी सुरु करणार नसल्याचा इशारा कर्मचारी संघटनेने दिला. या आंदोलनाचा फटका कचरा संकलनाला बसला. घंटागाडीचा न आल्याने सुमारे ३०टन कचरा हा सातारकरांच्या घरातच पडून राहिला.

Web Title: Bells closed .. trash in the house!