शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

दोघेजण सोडून बाकीचे मागे जा

By admin | Updated: October 18, 2014 23:26 IST

न्यायाधीशांचा आदेश : पावणेदोन तास न्यायालयात निरव शांतता; कार्यकर्त्यांची प्रचंड घालमेल

सातारा : महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांच्या खूनप्रकरणाचा निकाल शनिवारी जाहीर होणार असल्याने न्यायालय अगदी खचाखच भरले होते. निकाल लागेपर्यंत प्रत्येकाच्या ह्दयात धकधक होत होती...न्यायाधीश केव्हा निकाल सांगणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या... तब्बल पावणेदोन तासानंतर न्यायाधीशांनी निकाल सांगण्यास सुरुवात केल्यानंतर सगळ्यांचे कान टवकारले.ठीक सकाळी अकरा वाजता न्यायाधीश आसनस्थ झाले. हॉलच्या दरवाजाजवळ दहा-बारा पोलीस उभे होते. आतमध्ये प्रवेश करणाऱ्यांना तपासून सोडत होते. उदयसिंह पाटील यांचे कार्यकर्तेही अगोदरच हॉलमध्ये येऊन बसले होते. न्यायाधीशांनी निकालपत्राचे सविस्तर डिक्टेशन सुरू केले. त्यावेळी उपस्थितांची घालमेल सुरू झाली. कोणत्याही क्षणी निकाल लागण्याची शक्यता होती. अधून-मधून कार्यकर्त्यांची आणि वकिलांचीही चुळबूळ सुरू व्हायची. न्यायाधीश आणि त्यांच्या शेजारी असणारे लिपिक निकालाचा सारांश लिहिण्यात मग्न होेते. काही आरोपी अस्वस्थ होत होते. त्यामुळे त्यांना पाण्याची बाटली द्यावी लागत होती. निकाल जाहीर होण्यास जसजसा वेळ लागत होता, तस-तशी उत्कंठा शिगेला पोहोचत होती. तब्बल पावणेदोन तासानंतर अखेर न्यायाधीशांनी ‘सर्व आरोपींना पुढे आणा,’ असे पोलिसांना सांगितले. न्यायाधीशांसमोर संशयित आरोपी उभे राहिले. त्यानंतर न्यायाधीशांनी निकाल वाचण्यास सुरुवात केली. न्यायाधीशांनी सर्व आरोपींची नावे वाचून दाखविल्यानंतर ‘आरोपी नंबर एक सागर परमार, दोन हमीद शेख हे दोषी असून, उर्वरित नऊजण निर्दोष आहेत,’ असे जाहीर केले. त्यावेळी ज्यांची सुटका झाली. त्यांच्या चेहऱ्यावरचा आंनद द्विगुणीत झाला. निर्दोष सुटका झालेल्या आरोपींना न्यायाधीशांनी पाठीमागे बसण्यास सांगितले. मात्र, आरोपी सागर परमार आणि हमीद शेखला न्यायाधीशांनी पुढे उभे राहण्यास सांगितले. या दोघांना किती शिक्षा होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले.न्यायाधीशांनी शिक्षा जाहीर करण्यास सुरुवात केली. दोघांनाही वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येत असल्याचे न्यायाधीशांनी सांगताच शांतता पसरली. न्यायालयाच्या बाहेर उदयसिंह यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला. पोलिसांनी त्यांना अटकाव करून न्यायालयाच्या बाहेर काढले. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. (प्रतिनिधी)