बिअरची वाहतूक करणारा मालट्रक उलटला ; बाटल्या रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 13:57 IST2020-05-14T13:52:13+5:302020-05-14T13:57:30+5:30
पुणे-बेंगलोर महामार्गावर गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास उडतारे (ता. वाई) गावानजीक बिअरची वाहतूक करणारा मालट्रक उलटला. यामध्ये लाखो रुपयांची बिअर महामार्गाशेजारील सेवा रस्त्यावरून अक्षरश: पाण्यासारखी वाहिली. सुदैवाने या अपघातात ट्रकमधील कोणासही गंभीर दुखापत झाली नाही.

बिअरची वाहतूक करणारा मालट्रक उलटला ; बाटल्या रस्त्यावर
पाचवड : पुणे-बेंगलोर महामार्गावर गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास उडतारे (ता. वाई) गावानजीक बिअरची वाहतूक करणारा मालट्रक उलटला. यामध्ये लाखो रुपयांची बिअर महामार्गाशेजारील सेवा रस्त्यावरून अक्षरश: पाण्यासारखी वाहिली. सुदैवाने या अपघातात ट्रकमधील कोणासही गंभीर दुखापत झाली नाही.
याबाबत घटनास्थळ व भुईंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातारच्या दिशेने जाणारा मालट्रकवरील ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक उलटी होवून तो सेवारस्त्यावर आला. या अपघातात ट्रक मधील लाखो रुपये किमतीच्या बिअरच्या बॉक्स व बाटल्या फुटून त्यातील बियर पाण्यासारखी रस्त्यावर वाहू लागली. अपघातानंतर भुईंज पोलीस स्टेशनचा फौजफाटा घटनास्थळी काही मिनिटातच पोहोचल्याने महामार्गावरील वहातुक सुरुळीत झाली.
तळीरामांची मने हेलावली....
बिअरची वाहतूक करणारा ट्रक उडतारेनजीक उलटी झाल्याची घटना वाऱ्यासारखी परिसरात पसरली. त्यामुळे अनेक तळीरामांनी आपल्या घशाची कोरड शमवण्यासाठी गाड्या घटनास्थळाकडे दामटल्या. मात्र अपघात घडल्यानंतर काही तळीरामांची मने हेलावली.