सातारा: शहरांमध्ये केवळ दोन आठवड्यामध्ये बाधितांची संख्या झपाट्याने वाढली असून, रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याचे समोर येत आहे. सातारा शहरातील लोकांसाठी बेडची क्षमता ६१४ असून, सध्या शहरामध्ये ८९२ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
सातारा शहराची लोकसंख्या सुमारे दीड लाख आहे. या लोकसंख्येच्या मानाने बेडची क्षमता अत्यंत तुटपुंजी आहे. त्यातच केवळ सातारा शहरातीलच नव्हे, तर आजूबाजूच्या ग्रामीण भागातील लोकही साताऱ्यात ॲडमिट होत असल्यामुळे, मूळच्या सातारा शहरातील लोकांना रुग्णालयात बेड मिळत नसल्याचे पुढे आले आहे.
गतवर्षी सातारा शहरांमध्येही कोरोनाने अक्षरशः हाहाकार माजवला होता. यंदाही हीच परिस्थिती असून, पेटा पेठांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. गतवर्षी जसे आडवे बांबू लावून पेटा बंद केल्या होत्या. तसे या वर्षी करण्यात आले नाही. त्यामुळे बाधितांची संख्या आणखीनच वाढू लागली. ही बाब सातारकरासाठी चिंतेची असून, सध्या रुग्णालयातही बेड शिल्लक नाहीत. साताऱ्यातील अनेक कोरोनाबाधित रुग्णांनी रुग्णालयात दाखल होण्याऐवजी घरीच उपचार घेण्यावर भर दिला आहे. त्यामुळे रुग्णालयातील बेडवर आजूबाजूच्या गावातील लोकांनी कब्जा केलेल्या पाहायला मिळते, सातारा शहरातील जेवढे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तितक्या लोकांनी जर रुग्णालयात ॲडमिट व्हायचे म्हटले, तर बेड शिल्लकच राहिले नसते. मात्र, सध्या सध्याची बीडची शमता अत्यंत तुटपुंजी असून, ही क्षमता अजून वाढविण्याची गरज आहे.
चौकट : होम आयसोलेशनमध्ये ६१९ रुग्ण
साताऱ्यातील रुग्णालयात बेडची क्षमता ६१४ असली, तरी सातारा शहरातील कोरोनाबाधित रुग्णांनी घरीच उपचार घेणे पसंत केले आहे. असे एकूण होम आयसोलेशनमध्ये असलेले ६१९ रुग्ण असून, हे रुग्ण सध्या बरे होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे बेडसाठी प्रशासनावर मोठा भार पडला नाही.