हॉटेलात बसून सँडविच खाऊ न दिल्याने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:25 IST2021-06-30T04:25:24+5:302021-06-30T04:25:24+5:30

सातारा : हॉटेलमध्ये बसून सँडविच खायला न दिल्याच्या रागातून दोघांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी ८ जणांवर सातारा शहर पोलीस ...

Beaten for not eating sandwiches while sitting in a hotel | हॉटेलात बसून सँडविच खाऊ न दिल्याने मारहाण

हॉटेलात बसून सँडविच खाऊ न दिल्याने मारहाण

सातारा : हॉटेलमध्ये बसून सँडविच खायला न दिल्याच्या रागातून दोघांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी ८ जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी सागर दिनकर पवार (वय २६, रा. विकासनगर, सातारा. मूळ रा. निसराळे, ता. सातारा) याने तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार टॉम जगताप, राज जाधव, अनिकेत जाधव व त्यांच्या पाच सहकाºयांवर (पूर्ण नाव, पत्ता नाही. सर्व रा. सातारा) यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.

सोमवारी सकाळी अकरा वाजता संशयितांनी नटराज मंदिर परिसरात ब् दमूेोलवून घेतले. आपले भांडण मिटविण्यासाठी ल्हासुर्णे येथे जाऊया असे संबंधितांनी सांगितले. त्यानंतर गाडीवरून मंगळापूर, ता. कोरेगाव येथील एका शाळेजवळ गेलो. त्या ठिकाणी मला व मित्राला लाथाबुक्या व दगडाने मारहाण केली, असे सागर पवार याने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यातील हवालदार भोसले हे तपास करत आहेत.

..............................................................

Web Title: Beaten for not eating sandwiches while sitting in a hotel