डाकू लोक उध्दव ठाकरेंना चुकीची माहिती देतात, गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

By नितीन काळेल | Updated: February 8, 2023 20:22 IST2023-02-08T20:22:51+5:302023-02-08T20:22:57+5:30

उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन टीका केल्याचा प्रश्न पत्रकारांनी केला.

Bandits give wrong information to Uddhav Thackeray, Gulabrao Patil attacks Sanjay Raut | डाकू लोक उध्दव ठाकरेंना चुकीची माहिती देतात, गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

डाकू लोक उध्दव ठाकरेंना चुकीची माहिती देतात, गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

सातारा : जो माणूस कधी नगरसेवक म्हणून निवडूण आला नाही. असे चार-पाच डाकू लोक उध्दव ठाकरे यांना चुकीची माहिती देत आहेत. त्यामुळेच शिवसेनेवर सध्या चुकीची वेळ आली आहे,’ असा हल्लाबोल शिंदे गटातील नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर केला.

सातारा येथे जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तर कार्यशाळा आणि जिल्ह्यातील विविध पाणी योजनांचा ई भूमिपूजन समारंभ मंत्री पाटील यांच्या हस्ते झाला. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयावर भाष्य केले. मंत्री पाटील म्हणाले, ‘जलजीवन मिशनमध्ये सातारा जिल्ह्याचे काम चांगले आहे. देशातील ही कदाचित शेवटची पाणी योजना असणार आहे. त्यामुळे कामे चांगली व्हावीत.

उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन टिका केल्याचा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर मंत्री पाटील म्हणाले, शिळ्या कडीला ऊत देण्यात अर`थ नाही. कारण, या गोष्टीला सहा महिने होऊ गेले आहेत. नेहमी नवीन चित्रपट येतो तसेच आहे. आम्हाला आता विकास करायचाय. तसेच पत्रकारांच्या प्रश्नानंतर पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही उध्दव ठाकरेंना चुकीची माहिती देत असल्याबद्दल जोरदार निशाणा साधला.

Web Title: Bandits give wrong information to Uddhav Thackeray, Gulabrao Patil attacks Sanjay Raut