खरिपाच्या पेरणीत बळीराजा व्यस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:50 IST2021-06-16T04:50:46+5:302021-06-16T04:50:46+5:30
नागठाणे : नागठाणे व परिसरात सध्या खरीप हंगामातील पेरणीची कामे जोमाने सुरू असल्यामुळे बळीराजा पेरणीसोबतच आले पिकाच्या मशागतीच्या कामात ...

खरिपाच्या पेरणीत बळीराजा व्यस्त
नागठाणे : नागठाणे व परिसरात सध्या खरीप हंगामातील पेरणीची कामे जोमाने सुरू असल्यामुळे बळीराजा पेरणीसोबतच आले पिकाच्या मशागतीच्या कामात पूर्णपणे व्यस्त असल्याचे चित्र आहे.
नागठाणे परिसरात खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतीची पूर्वमशागत तसेच हंगाम पेरणी आणि नवीन आले लागवडीची कामे जोमाने सुरू झाली आहेत. नागठाणेसह काशीळ, निसराळे, खोडद, अतित, माजगाव, नागठाणे, सासपडे, पाडळी, निनाम, सोनापूर, मांडवे, बोरगाव, भरतगाववाडी, भरतगाव तसेच वळसे, आदी गावांमध्ये अक्षय्य तृतीयेपासून आले या नगदी पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. तसेच सध्या खरीप हंगामात सोयाबीन, भुईमूग, मका तसेच कडधान्याचीही लागवड मोठया प्रमाणावर सुरू आहे.
सध्याची परिस्थिती पाहता नवीन आले लागवडीची कामे पूर्ण होत आली असून, ऊस आणि आले पिकाची मशागतीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. आले पिकाला इच्छित हमीभाव मिळत नसल्यामुळे बळीराजा पूर्णपणे हताश झालेला दिसत असला तरीही खरिपाच्या पिकांसाठी बळीराजा वरुणराजाच्या आगमनाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे.