कराडला पथनाट्याद्वारे कोरोनाबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:53 IST2021-02-25T04:53:20+5:302021-02-25T04:53:20+5:30

कराड : स्वच्छ सर्वेक्षण २०२१, माझी वसुंधरा अभियान व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कराड नगर परिषदेच्या वतीने ...

Awareness about Corona through street plays to Karad | कराडला पथनाट्याद्वारे कोरोनाबाबत जनजागृती

कराडला पथनाट्याद्वारे कोरोनाबाबत जनजागृती

कराड : स्वच्छ सर्वेक्षण २०२१, माझी वसुंधरा अभियान व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कराड नगर परिषदेच्या वतीने शहरातील १४ प्रभागांमध्ये पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. नगरपालिकेने स्वच्छतेत देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या स्वच्छतेतील सातत्य टिकवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

सलग दोन वर्षे स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये कराड नगर परिषदेने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने राज्य शासन व जिल्हा प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही नियमावली जाहीर केली आहे. या दोन्ही विषयांचा विचार करून कराड नगर परिषदेने नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी पथनाट्याद्वारे १४ प्रभागांमध्ये पथनाट्याचे सादरीकरण करून नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. तर कोरोनापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाच्या सुरक्षेच्या दृष्टीने माहिती देण्यात आली.

पथनाट्याद्वारे सादरीकरण होत असताना नागरिकांनी याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना व वाहनचालकांना मास्क वापरा हा संदेश प्रामुख्याने दिला जात होता. या पथनाट्याचे सादरीकरण व जनजागृतीसाठी मुख्याधिकारी रमाकांत डाके, आरोग्य समितीचे सभापती विजय वाटेगावकर यांनी नियोजन केले.

Web Title: Awareness about Corona through street plays to Karad