औषधनिर्माण महाविद्यालयास पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:40 IST2021-04-09T04:40:31+5:302021-04-09T04:40:31+5:30
कराड येथील शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाला उत्कृष्ट औषध वनस्पती उद्यान आणि स्वच्छ परिसर पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. हा ...

औषधनिर्माण महाविद्यालयास पुरस्कार
कराड
येथील शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाला उत्कृष्ट औषध वनस्पती उद्यान आणि स्वच्छ परिसर पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार प्राचार्य डॉ. के. बी. बुराडे व प्रबंधक डी. ए. कांबळे यांनी नुकताच स्वीकारला.
दिव्य स्वप्न फाऊंडेशन, कोल्हापूर यांच्या वतीने सदरचा पुरस्कार देण्यात आला आहे. त्याचे वितरण सामाजिक अंतर पाळून नुकतेच झाले. यावेळी शिवराज जाधव, ऐश्वर्या जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाने अनेक दुर्मीळ आणि औषधी वनस्पतींची लागवड केली असून, आरोग्याच्या दृष्टीने समाजाला पडलेल्या अनेक समस्यांचे उत्तर आपल्यास मातीतून निर्माण झालेल्या वनस्पतींच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे.