शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Satara: ताबा कसा घेताय म्हणत स्वत:च्या पोटात चाकू मारुन आत्महत्येचा प्रयत्न, शिरवळमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 11:45 IST

मुराद पटेल  शिरवळ: तुम्ही ताबा कसा घेताय ते मी तुम्हाला आता दाखवतो असे म्हणत हॉटेल मालकाने स्वतःच्या पोटात चाकू ...

मुराद पटेल शिरवळ: तुम्ही ताबा कसा घेताय ते मी तुम्हाला आता दाखवतो असे म्हणत हॉटेल मालकाने स्वतःच्या पोटात चाकू मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. थकीत कर्ज प्रकरणी पतसंस्थेने कायदेशीर प्रक्रिया करत स्थावर मालमत्तेचा ताबा घेताना हा प्रकार घडला. याप्रकरणी हॉटेल मालक उदय विनायक गोलांडे (वय ४९, रा.शिरवळ ता.खंडाळा) याच्याविरोधात शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर गोलांडे यांच्या पत्नी चक्कर येऊन पडल्याने घटनास्थळी गोंधळ उडाला. याबाबत अधिक माहिती अशी की, उदय गोलांडे यांनी शिरवळ येथील सदगुरू हरीबुवा महाराज नागरी सहकारी संस्थेतून सन २०१९ मध्ये हॉटेल गुरुकृपा व राहते घर असलेली स्थावर मालमत्ता तारण ठेऊन २० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्ज थकीत गेल्याने पतसंस्थेने कायदेशीर प्रक्रिया पार पाडत सातारा जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार नायब तहसीलदार योगेश चंदनशिवे, बँकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिस बंदोबस्तात गोलांडे यांच्या मिळकतीचे कब्जा प्रक्रिया सुरू केली. यावेळी गोलांडे यांनी तुम्ही ताबा कसा घेताय ते मी तुम्हाला आता दाखवतो असे म्हणून हॉटेलमधील चाकू घेत स्वतःच्या पोटात मारून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी नायब तहसीलदार योगेश चंदनशिवे व उपस्थितांनी प्रसंगावधान दाखविल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी तत्काळ त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. वसुली अधिकारी सम्राट भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरवळ पोलिस ठाण्यात उदय गोलांडे विरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक नयना कामथे अधिक तपास करीत आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस