शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

खंडाळ्यात आमदार मकरंद पाटील यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न, मराठा बांधव आक्रमक 

By दीपक शिंदे | Published: October 30, 2023 6:13 PM

खंडाळा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी खंडाळा तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरुवात ...

खंडाळा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी खंडाळा तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरुवात केली आहे. मात्र, या उपोषणास भेट न देता आमदार मकरंद पाटील हे साखर कारखान्याच्या कार्यक्रमास गेले. यामुळे आक्रमक क्रांती मोर्चाच्या समाजबांधवांनी कारखाना स्थळावर आमदारांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करून निषेध व्यक्त केला. त्यामुळे आरक्षण मुद्द्यावरून मराठा बांधव आक्रमक झाल्याचे दिसून आले.खंडाळा तालुका सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभाचा कार्यक्रम कारखाना स्थळावर घेण्यात आला होता. यावेळी काही आक्रमक मराठा समाजबांधवांनी प्रवेशद्वाराजवळच ‘एक मराठा लाख मराठा’ची घोषणाबाजी करीत आमदार मकरंद पाटील यांच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी निषेधही करण्यात आला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करीत आंदोलनकर्त्यांना रोखले. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.कार्यक्रम संपल्यानंतर मात्र आमदार मकरंद पाटील यांनी प्रमुख नेतेमंडळींसोबत उपोषणस्थळास भेट देऊन मराठा समाजबांधवांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांनी मराठा आरक्षणास पाठिंबा असल्याचे स्पष्ट करीत वाढदिवसाचे फलकही काढण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले.

आमदार मकरंद पाटील यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. मात्र, आजची त्यांची कृती खेदजनक वाटते. मराठा बांधवांना भेटण्यापेक्षा कारखान्यात मोळी टाकणे त्यांना जास्त महत्त्वाचे वाटले. वास्तविक, त्यांनी मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेऊन विधानसभेत आवाज उठविणे अपेक्षित आहे. मात्र, त्यांच्याकडून असे घडताना दिसत नाही, त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करतो. - युवराज ढमाळ, मराठा क्रांती मोर्चा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMaratha Reservationमराठा आरक्षणMakarand Patilमकरंद पाटील