शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या महिला आघाडी कार्याध्यक्षांच्या बंगल्यावर हल्ला, सातारा जिल्ह्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 18:29 IST

दोन्ही कुटुंबियांकडून पुसेगाव पोलिसांत परस्पर विरोधी तक्रारी

पुसेगाव : खटाव तालुक्यातील ललगुण परिसरातील एका हॉटेलमध्ये बेकायदेशीर दारू विक्री, तर लॉजवर गैरप्रकार होत असल्याबद्दल तक्रार केल्याचा राग मनात धरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा मुमताज मुलाणी यांच्या घरावर जमावाने काल, बुधवारी रात्री हल्ला केला. याप्रकरणी पुसेगाव पोलिस ठाण्यात दोन महिलांसह चारजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन्ही कुटुंबियांकडून पुसेगाव पोलिसांत परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.मुलाणी यांनी दिलेल्या तक्रारीत, ललगुण हद्दीतील शिंदेवाडी फाट्यावर असलेल्या एका हॉटेलमध्ये दारू विक्री, तर लॉजवर गैरप्रकार चालत असल्याबद्दल मुमताज मुलाणी यांनी आवाज उठवत संबंधित खात्याकडे तक्रारी केल्या आहेत. याचाच राग मनात धरून हॉटेलचे मालक बाळासाहेब माने, अजित माने, संभाजी माने, इंदूबाई माने, मेघा माने, मयूर माने यांनी मुलाणी यांच्या बंगल्यावर हल्ला केला. तर, गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली. दगडफेक करुन गाडीची काच फोडली. दोघांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे नमूद करण्यात आले आहे.बाळू ऊर्फ बाळासाहेब संभाजी माने यांच्या तक्रारीनुसार, मुलगा मयूर याने मुलाणी यांच्या बंगल्यासमोर गाडी रेस केल्याचा गैरसमज झाल्याने दोन्ही कुटुंबांत भांडण झाले. दरम्यान, मयूर माने याची मोटारसायकल रस्त्यात अडवून त्यास शिवीगाळ, दमदाटी करून हुसेन मुलाणी याने लोखंडी धारदार वस्तू हातावर मारून दुखापत केली. त्याचा जाब विचारण्यास गेले असता, मुलाणी पती-पत्नी दोघांनी त्यांना ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस हवालदार सी. आर. खाडे करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसNCPराष्ट्रवादी काँग्रेस