खळबळजनक! मित्रांच्या मदतीने तरूणाचा युवतीवर अत्याचार, चौघांवर गुन्हा; साताऱ्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 18:51 IST2022-01-03T18:49:11+5:302022-01-03T18:51:38+5:30

३१ डिसेंबर रोजी रात्री पीडित २३ वर्षांय युवती तिच्या घराबाहेर उभी होती. त्यावेळी हे सर्व संशयित युवक तेथे गेले. युवतीला काही कळायच्या आत संबंधितांनी तिला जमिनीवर खाली पाडून अत्याचार केला.

Atrocities on 23 year old girl in a village in Satara taluka | खळबळजनक! मित्रांच्या मदतीने तरूणाचा युवतीवर अत्याचार, चौघांवर गुन्हा; साताऱ्यातील घटना

खळबळजनक! मित्रांच्या मदतीने तरूणाचा युवतीवर अत्याचार, चौघांवर गुन्हा; साताऱ्यातील घटना

सातारा : सर्वजण ३१ डिसेंबर साजरा करण्यात मग्न असताना सातारा जिल्ह्यातील एका गावात मात्र घृणास्पद प्रकार घडला. मित्रांना हात पाय धरायला लावून एका तरूणाने २३ वर्षांच्या युवतीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली. सातारा तालुक्यातील एका गावामध्ये ही घटना घडलीय. याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

आनंद संपत काळे, संकेत आनंद काळे, शाहीर शर्मा भोसले, नितीन शेखसाहेब भोसले अशी गुन्हा दाखल झालेल्या युवकांची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ३१ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता पीडित २३ वर्षीय युवती तिच्या घराबाहेर उभी होती. त्यावेळी हे सर्व संशयित युवक तेथे गेले. युवतीला काही कळायच्या आत संबंधितांनी तिला जमिनीवर खाली पाडून तिचे हात पाय धरले. त्यानंतर आनंद काळे याने तिच्यावर अत्याचार केला. या प्रकारानंतर संबंधित संशयित तेथून पसार झाले. 

या प्रकाराची माहिती मुलीने तिच्या घरच्यांना दिल्यानंतर मुलीला घेऊन घरातील लोक सातारा तालुका पोलीस ठाण्यात आले. मुलीसोबत घडलेली घटना ऐकून पोलिसांनी तत्काळ संबंधित युवकांवर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली. रात्री उशिरापर्यंत यातील कोणत्याही संशयित आरोपीला अटक झाली नव्हती. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत. 

Web Title: Atrocities on 23 year old girl in a village in Satara taluka