अंधारात बसलेल्या टोळक्यालाकडून दोन पोलिसावर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 13:36 IST2020-10-21T13:32:19+5:302020-10-21T13:36:02+5:30
Crimenews, policedepartment, sataranews सातारा जिल्हा पोलीस दलातील दोन पोलीसकर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला झाला. यातील एक पोलीस गंभीर जखमी आहे. दोन्ही पोलिसांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस दिनाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली. दरम्यान, एका संशयितालापोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अंधारात बसलेल्या टोळक्यालाकडून दोन पोलिसावर प्राणघातक हल्ला
सातारा : जिल्हा पोलीस दलातील दोन पोलीसकर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला झाला. यातील एक पोलीस गंभीर जखमी आहे. दोन्ही पोलिसांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस दिनाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली. दरम्यान, एका संशयितालापोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत सातारा शहरलगत शिवराज पेट्रोल पंपजवळ महामार्ग परिसरात ही घटना घडली. मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पोलीस कर्मचारी डोलारे व हिंडे हे पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी तीन, चार जणअंधारात असल्याने या दोन्ही पोलिसांनी संबंधितांना हटकले.
यामुळे संबंधितांनी अचानक दोघा पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला चढवला. याहल्ल्यात हिंडे हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून तत्काळ यातील एका संशयिताला पकडले आहे.