शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
2
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
3
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
4
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
5
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
6
T20 World Cup 2024: सुपर आठमध्ये अनपेक्षित निकाल शक्य
7
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
8
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
9
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
10
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
11
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
12
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
13
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
14
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
15
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
16
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
17
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
18
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
19
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
20
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!

शिरवळच्या जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे पाणी पेटले, ७ जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 5:25 PM

शिरवळ : शिरवळच्या जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे पाणी पेटले असून, योजनेचे काम सुरू न झाल्याने भाजपाचे राज्य सरचिटणीस अनुप सूर्यवंशी ...

शिरवळ : शिरवळच्या जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे पाणी पेटले असून, योजनेचे काम सुरू न झाल्याने भाजपाचे राज्य सरचिटणीस अनुप सूर्यवंशी यांच्यासह ७ युवकांनी शिरवळ ग्रामपंचायतीसमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परंतु शिरवळ पोलिसांच्या सतर्कतेमुळे आंदोलकांना ताब्यात घेण्यात यश आले.  शिरवळ, ता. खंडाळा याठिकाणी शासनाच्या जलजीवन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ४ कोटी ७२ लाख ८३ हजार ६६७ रुपये किमतीची जलशुद्धीकरण पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली आहे. दरम्यान, शिरवळ गावच्या पाणीपुरवठा योजनेबाबत शासनाच्या नियमावलीनुसार नवीन योजनेमध्ये २० दशलक्ष लिटर क्षमतेची जलशुद्धीकरण केंद्रासाठी १० गुंठे व १.८० लाख लिटर क्षमतेच्या उंच टाकीसाठी २ गुंठे जागा अत्यावश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याबाबत शिरवळच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जुन्या पाण्याच्या टाकीजवळ शिरवळ ग्रामपंचायतीकडून जागा सूचित करण्यात आली होती. 

मात्र, उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा परिषद उपविभाग, खंडाळा यांच्या पाहणीनंतर ही जागा शासकीय नियमावलीनुसार शिरवळसाठी अपुरी असल्याबाबत जागेची मोजमापे घेण्यात आल्यानंतर निदर्शनास आले. त्यानुसार उपअभियंता खंडाळा उपविभाग व कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा सातारा जिल्हा परिषद यांचा अहवाल प्राप्त होताच याबाबत संबंधितांशी लेखी व तोंडी झालेल्या बैठकीमधील निर्णयानुसार व पाहणीनुसार शिरवळ येथील शासकीय गट नंबर ९४४ मधील जागा निश्चित करीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून भूमिपूजन करण्यात आले होते. त्यामुळे जुन्या पाण्याच्या टाकीजवळ जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात यावे, अशी मागणी जनता फाउंडेशनच्या युवकांनी करीत खंडाळा पंचायत समितीसमोर घंटानाद करीत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू न झाल्यास गुरुवार, दि.१२ ऑक्टोबर रोजी शिरवळ ग्रामपंचायतसमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे शिरवळ ग्रामपंचायतीला शिरवळ पोलिसांच्या छावणीचे रूप येत सकाळी ८ वाजेपासून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास भारतीय जनता पार्टीचे राज्य सरचिटणीस अनुप सूर्यवंशी, जनता फाउंडेशनचे अध्यक्ष अजिंक्य कांबळे, इम्रान काझी, हितेश जाधव, गणेश पानसरे, गजानन कुडाळकर, केदार हाडके यांनी शिरवळ ग्रामपंचायतीसमोर येत अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे संबंधित आंदोलकांना ताब्यात घेण्यात यश आल्याने पुढील अनर्थ टळला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी