शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात हायस्पीडचे ५२ बळी!, एका महिन्यातील विदारक स्थिती 

By दत्ता यादव | Updated: June 6, 2025 15:10 IST

वेगावर नियंत्रण नसल्याने कुटुंबांची वाताहत

दत्ता यादवसातारा : नैसर्गिक मृत्यूपेक्षाअपघातीमृत्यू होण्याचे प्रमाण वाढले असून, सातारा जिल्ह्यात एप्रिल महिन्यात तब्बल ५२ जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. या अपघाताचे एकमेव कारण हायस्पीड हे आहे. आपल्या कर्त्या पुरुषाच्या मृत्यूमुळे अनेक कुटुंबांची अक्षरश: वाताहत झाली आहे.आपल्या घरातील कर्ता पुरुष सकाळी घरातून कामावर जातो. मात्र, संध्याकाळी तो सुरक्षित परत येईल की नाही, याचा सध्या कोणालाही भरवसा नाही. रस्ते चकाचक झाले. परिणामी वेग वाढला. मात्र, गाडीवर भरवसा ठेवून वाहनचालकांचा अतिवेग नडत आहे. अपघात हा कधीही सांगून होत नाही. पण खबरदारी घ्यावी लागते. वाहनचालक आपल्याच धुंदीत, घाईगडबडीत, अतिआत्मविश्वास ठेवून वाहने हायस्पीडने चालवत आहेत. यामुळे स्वत:सह दुसऱ्याच्या आयुष्याचीही राखरांगोळी करत आहेत.

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्रत्येक अपघातावेळी पोलिसांच्या निदर्शनास येते. सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना वाहनचालक करत नाहीत. बरेच कारचालक सीटबेल्ट न लावता व दुचाकी चालक हेल्मेट न घालता वाहन चालवतात. अशा वेळी अपघात झाल्यास दुर्दैवाने वाहनचालकांचा जागीच मृत्यू होतोय.महामार्गावर १४५ च्या अतिवेगाने प्रवास..महामार्गावर सध्या काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांत पाणी साचत असल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. तरीसुद्धा अनेक वाहनचालक १४० ते १४५ च्या स्पीडने वाहने चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. अशा वेळी खड्ड्यात गाडी आदळून चालकाचे नियंत्रण सुटत आहे.

ही आहेत अपघाताची कारणे..अतिवेग हे अपघाताचे प्रमुख कारण ठरत आहे. तसेच घाईगडबड आणि कोणत्याही परिस्थितीत गाडीवर नियंत्रण मिळवू शकतो. हा अनेक चालकांचा अतिआत्मविश्वास. याशिवाय धोकादायक वळण, खड्डे, गाडीचा टायर फुटण्याची समस्या. मधधुंद अवस्थेत वाहन चालविणे, अशी काही अपघात होण्याची प्रमुख कारणे आहेत.

अपघात कुठे झाले..जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग व आंतरजिल्ह्यातील रस्त्यांवर एप्रिल महिन्यांत ९८ अपघात झाले. यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर १७ अपघात झाले असून, यात ५ जण ठार झाले. राज्यमार्गावर २१ अपघात झाले असून, यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला, तर आंतरजिल्हा मार्गावर ६० अपघात झाले. यात सर्वाधिक ३५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अशा प्रकारे एप्रिल महिन्यात एकूण ५२ जणांचा हायस्पीडने बळी घेतला आहे.

वेगावर नियंत्रण ठेवावे. आपले बरे-वाईट झाले, तर आपल्या पश्चात कुटुंबाचे काय होईल, याचा वाहनचालकांनी विचार करावा. वाहतुकीचे नियम पाळून वाहन चालविल्यास आपला प्रवास सुरक्षित होईल. - विकास धस, पोलिस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातDeathमृत्यूhighwayमहामार्ग