वाघजाईवाडीत वणवा लावणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 16:34 IST2021-03-18T16:32:39+5:302021-03-18T16:34:12+5:30
Fire ForestDepartmenet Satara- चाफळ विभागातील वाघजाईवाडी-डेरवण येथे वन कंपाऊंड नंबर ४४२ या क्षेत्रास वणवा लावणाऱ्यास वनविभागाने अटक केली. संजय रामचंद्र महिपाल (वय ५५, रा. वाघजाईवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वाघजाईवाडीत वणवा लावणाऱ्यास अटक
चाफळ : विभागातील वाघजाईवाडी-डेरवण येथे वन कंपाऊंड नंबर ४४२ या क्षेत्रास वणवा लावणाऱ्यास वनविभागाने अटक केली. संजय रामचंद्र महिपाल (वय ५५, रा. वाघजाईवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
वाघजाईवाडी-डेरवण येथे वन कंपाऊंड नंबर ४४२ लगत खासगी मालकी क्षेत्रात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वणवा लागल्याने वन कर्मचारी व ग्रामस्थांनी जागेवर जाऊन तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. वाघजाईवाडी येथील संजय महिपाल याने त्याच्या शेतीचा बांध जाळताना सुटलेल्या वाऱ्यामुळे आग नियंत्रणात न आल्याने वणवा भडकल्याचे वनाधिकाऱ्यांना दिसून आले.
महिपाल यांच्या निष्काळजीपणामुळे वनक्षेत्रात वणवा गेल्याने त्याला वनविभागाने तात्काळ अटक करीत त्याच्याविरुध्द भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २६ (१) ब व क अन्वये गुन्हा नोंदविला. आरोपीला पाटण न्यायालयासमोर हजर केले असता त्यास न्यायालयाने पाच हजार रुपयांचा दंड ठोठवला. वनक्षेत्रपाल विलास काळे, वनपाल एस. बी. भाट, वनरक्षक विलास वाघमारे व वनमजुर यांनी ही कारवाई केली.