शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

वाईत ज्वेलर्सच्या दुकानावर सशस्त्र दरोडा

By admin | Updated: April 16, 2015 00:04 IST

चाकूचा धाक दाखवून लुटले : पोलिसांच्या पथकाची तत्काळ कारवाई; एका आरोपीला पकडण्यात यश

सातारा : दुकान मालकाला चाकूचा धाक दाखवून सहा दरोडेखोरांनी सोन्या-चांदीचा तब्बल दीड लाखाचा ऐवज चोरून नेला; परंतु त्याचवेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांना हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ आरोपींचा शोध घेऊन एकाला पकडण्यात यश आले. ही घटना वाई येथील धर्मपुरी महावीर चौकातील एका ज्वेलर्सच्या दुकानात मंगळवारी रात्री दोनच्या सुमारास घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रवीण शंकरलाल ओसवाल (रा. धर्मपुरी, वाई) यांचे धर्मपुरीतील चौकात ‘सोनमल डोंगरजी अ‍ॅन्ड सन्स’ या नावाचे दुकान आहे. प्रवीण ओसवाल हे मंगळवारी दुपारी पुण्याला गेले होते. त्यांना घरी परत येण्यास रात्री उशीर झाला. रात्री दोनच्या सुमारास ते वाई येथे आले. त्यानंतर घराकडे चालत जात असताना त्यांना दुकानाला कुलूप लावले नसल्याचे दिसले. ‘कुलूप लावायचे वडील विसरले की काय,’ असे प्रवीण यांना वाटले. त्यामुळे ते घरी गेले. घरी गेल्यानंतर वडिलांना त्यांनी ‘दुकानाला कुलूप का लावले नाही,’ असे विचारले. त्यावेळी वडिलांनी ‘मी दुकानाला कुलूप लावले आहे,’ असे सांगितले. हे ऐकून प्रवीण ओसवाल यांनी तत्काळ दुकानाकडे धाव घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत मित्र होता. ओसवाल यांनी दुकानामध्ये प्रवेश केल्यानंतर दुकानात सहाजण होते. त्यातील एकाने ओसवाल यांना चाकूचा धाक दाखविला. ओसवाल यांना ढकलून देऊन सगळे दरोडेखोर पळून गेले. खाली चौकामध्ये गस्तीवर असलेल्या पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ याची दखल घेऊन आरोपींचा शोध सुरू केला. त्यावेळी धर्मपुरीपासून काहीअंतरावर एका आरोपीला पकडण्यात यश आले. त्याला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याने देवराज बाबू जाधव (वय २०, रा. कवठे एकंद, ता. तासगाव जि. सांगली) असे नाव सांगितले.दुकानातून पळून जाताना दरोडेखोरांनी सोन्या-चांदीचे दागिने त्यामध्ये सोन्याची चमकी, लाखी डोरल्याचे २६ नग, सोन्याचे टॉप्स जोड एक, सोन्याची अंगठी, चेन, नेकलेस, तुकडा काळे मनी पॅकेट, चांदीची जोडवी, सोने लाखी डोरली २६ नग असा दीड लाखाचा ऐवज त्यांनी लंपास केला; परंतु आरोपी देवराज जाधवकडून काही ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. मात्र, पळून जाण्यात यशस्वी झालेल्या आरोपींकडे अजून ऐवज आहे. (प्रतिनिधी)संशयित टोळी रेकॉर्डवरील !वाई दरोड्यातील एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. त्यामुळे इतर आरोपींचीही नावे तपासात निष्पन्न झाली आहेत. ही टोळी रेकॉर्डवरील असल्याचे पोलिसांनी सांगितले. काही दिवसांतच या टोळीतील उर्वरित दरोडेखोरांच्या मुसक्या आवळू, असे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ !वाई येथील धर्मपुरी चौकामध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा पडल्याने इतर व्यावसयिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. काही व्यावसायिकांनी आपल्या दुकानाची कुलपे व्यवस्थित आहेत का, याची खातरजमा सुरू केली आहे. तर काहीनी दुकानासमोर सुरक्षारक्षक नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलिसांनी या टोळीचा छडा लावावा, अशी मागणी येथील व्यावसायिकांनी केली आहे.