शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांशी हुज्जत, फलटणच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 12:28 IST

फलटण : शासकीय कर्तव्य बजावत असताना गणपती विसर्जन मिरवणूक मार्गातील मंडळांना वाहने हळूहळू पुढे घेण्याकरिता विनंती करीत असताना बाल ...

फलटण : शासकीय कर्तव्य बजावत असताना गणपती विसर्जन मिरवणूक मार्गातील मंडळांना वाहने हळूहळू पुढे घेण्याकरिता विनंती करीत असताना बाल शिवाजी गणेश उत्सव मंडळ, बुरुडगल्ली, फलटण या मंडळातील सदस्य माजी नगरसेवक किशोर उर्फ गुड्डू धनराज पवार याने पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्याशी हुज्जत घातली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी किशोर उर्फ गुड्डू पवार, धनराज पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यामधून मिळालेली माहिती अशी की, गणपती विसर्जन मिरवणूक मार्गातील मंडळाची वाहने सावकाश पुढे घेण्याकरिता विनंती करीत असताना बाल शिवाजी गणेश उत्सव मंडळ, बुरुडगल्ली, फलटण, ता. फलटण या मंडळातील सदस्य किशोर उर्फ गुड्डू धनराज पवार याने मला व माझ्याबरोबर असलेल्या पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्याशी हुज्जत घातली. ‘आमच्या मंडळाचे वाहन पुढे घेणार नाही, कोण गाडी पुढे घेतो तेच बघतो,’ असे म्हणून पोलिस अधिकारी व अंमलदार यांना शिवीगाळ करून अंगावर धावून आला असल्याची फिर्याद सहायक पोलिस निरीक्षक नितीन बाबुराव शिंदे यांनी दिली आहे. पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरphaltan-acफलटणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस