शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू
2
'जुबिन गर्ग यांची हत्या झाली!'; आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा सिंगापूर मृत्यू प्रकरणावर धक्कादायक दावा
3
IND vs SA 2nd Test : द.आफ्रिकेनं ठेवलं अशक्यप्राय लक्ष्य! टीम इंडियासमोर सामना वाचवण्याचं आव्हान
4
धक्कादायक! 'गुप्त रोग' बरे करण्याच्या नावाखाली भोंदू बाबाने ४८ लाखांना फसवलं; इंजिनीअरची किडनीही फेल 
5
हाय-डिमांड नोकऱ्यांची लिस्ट आऊट! या २५ फील्डमध्ये पडणार पगाराचा जोरदार पाऊस!
6
सेलिना जेटलीचा पतीवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप, ५० कोटींसह मागितला घटस्फोट
7
"हा केवळ ध्वज नाही तर,..." राम मंदिराच्या शिखरावर भगवा फडकावल्यानंतर PM Modi म्हणाले...
8
महानगरपालिका प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत वाढवा; काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र
9
"सरकार कोणाचेही असो, मानसन्मान पाळायलाच पाहिजे"; सुप्रिया सुळेंची CM-DCM वर टीका
10
12000 वर्षांनी Hayli Gubbi ज्वालामुखी खवळला; सॅटलाईटने टिपली उद्रेक होतानाची भयावह दृश्ये
11
शेअर बाजारात इतिहासातील सर्वात मोठी घसरण होणार, दिग्गजानं केली भविष्यवाणी; म्हटलं, "गुंतवणूकदारांना आपली संपत्ती..."
12
मालेगावनंतर बीड हादरले! साडेपाच वर्षांच्या मुलीवर नात्यातील मुलाचा अत्याचार, ४ दिवस वेदनेत
13
उबर कंपनीत परप्रांतीय आणि स्थानिक चालकांमध्ये भेदभाव? ड्रायव्हर्सचे कार्यालयाबाहेर आंदोलन
14
आजचा दिवस संकल्पपूर्तीचा; शांती पसरवणारा, समृद्धी देणारा भारत स्थापन करूया- मोहन भागवत
15
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र सप्ताह कधीपासून सुरू करावा? पाहा, मान्यता, महत्त्वाच्या गोष्टी
16
सासूने थिनर आणले अन् पतीने पेटवून दिले; चार्जशीटमध्ये झाला निक्की भाटी हत्या प्रकरणाचा मोठा खुलासा
17
IND vs SA 2nd Test : दुसरे सत्रही दक्षिण आफ्रिकेच्या नावे; ५०० पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली, तरी...
18
"तिजोरी तुमच्याकडे असली तरी ‘तिजोरी’चा मालक आमच्याकडे"; चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना टोला
19
"सोहम माझा मित्र...", मंजिरीच्या खऱ्या आयुष्यातील होणाऱ्या नवऱ्याला 'राया'ने दिला सल्ला
20
पतीची हत्या करून मृतदेह निळ्या ड्रममध्ये टाकणारी मुस्कान झाली आई; पण बाळ कुणाचं? साहिलनेही विचारला प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांमधील भांडणे मिटवताना वाद, साताऱ्यात तरुणाच्या खुनाचा प्रयत्न; आठजणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 15:53 IST

संशयितांची धरपकड

सातारा: पेठेतील लहान मुलांमधील झालेले भांडण मिटविण्यासाठी एकत्र आलेल्या तरुणांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन एका तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना दि. ८ रोजी दुपारी अडीच वाजता साताऱ्यातील यादोगोपाळ पेठेत घडली. याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये आर्यन रमेश कांबळे, आर्यन कांबळे, सूरज उंबरकर, भूषण बाबर, शौर्य परदेशी यांच्यासह अन्य तीन अनोळखी तरुणांचा (सर्व नागर रा. सैदापूर, ता. सातारा) समावेश आहे.या प्रकरणाची फिर्याद नील हेमंत दीक्षित (वय २०, रा. मंगळवार पेठ, सातारा) यांनी दिली आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहेकी, यादोगोपाळ पेठेतील लहान मुलांमध्ये भांडण झाले होते. भांडण मिटवण्याच्या उद्देशाने संशयित आले. त्यांनी त्यांच्या मित्र कनिष्क सचिन जांगळेला (२४, रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) ‘तू आमच्या लहान मुलांना मारहाण का केली?’ असे विचारले.कनिष्कने ‘मी त्या मुलांना मारले नाही,’ असे सांगितले, मात्र त्याला जीवे मारण्याच्या हेतुने लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. यात कनिष्कच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास महिला सहायक पोलिस निरीक्षक बाबर करत आहेत.

संशयितांची धरपकडया वादामुळे यादोगोपाळ पेठेत तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून कसून चौकशी सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Dispute over children's fight leads to attempted murder.

Web Summary : A dispute over children fighting in Satara escalated, resulting in an attempted murder. Eight individuals are charged after a young man was severely injured with iron rods. Police are investigating.