शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आपण खरेच महायुतीत आहोत का?, रामराजेंच्या कार्यकर्त्यांचा अजित पवारांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 12:09 IST

रामराजे हुलकावणी देण्यात पटाईत

फलटण : आम्ही पक्षाचे निष्ठने काम करतो, पण कार्यकर्त्यांना ईडी, पोलिस व इतर पद्धतीने धमकावले जात आहे. हे किती दिवस सहन करायचे ?, आपण युती धर्म पाळायचा आणि त्यांनी दबाव टाकायचा. आपण खरेच महायुतीत आहोत का?, असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर आपबिती मांडली. त्यावर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल. गरज पडल्यास थेट केंद्रीय नेतृत्वाशी बोलू, अशी ग्वाही कार्यकर्त्यांना दिली.उपमुख्यमंत्री अजित पवार हे फलटण येथे जनसंवाद यात्रा, लाडकी बहीण योजना व इतर योजनांच्या प्रचारासाठी आले होते. संवाद यात्रेनंतर कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजीवराजे नाईक-निंबाळकर यावेळी उपस्थित होते.अजित पवार म्हणाले, महायुतीत एकत्र राहायचे आणि एकमेकांचे कार्यकर्ते फोडायचे हे सहन केले जाणार नाही. फलटण-कोरेगावात जिल्हा परिषद, तसेच पंचायत समितीत जे वर्चस्व आहे, हे सगळे कार्यकर्त्यांच्या जोरावर. त्यामुळे कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल. युतीतील इतर सहकाऱ्यांशी बोलून तुमचे प्रश्न सोडवू. कुणावरही अन्याय होणार नाही. प्रशासनावर आपली पकड आहे. तुम्ही निश्चित राहा, असे आश्वासन कार्यकर्त्यांच्या व्यथा आणि तक्रारी ऐकल्यानंतर अजित पवार यांनी दिले.

रामराजे हुलकावणी देण्यात पटाईतरामराजे यांनी तुतारी वाजवायला किती वेळ लागणार आहे, असे वक्तव्य केल्यावर महाराष्ट्रातून फोन आले. त्यांना मी सांगितले, रामराजे हुलकावणी देण्यात पटाईत आहेत. ते काल जे बोलले ती हुलकावणी होती. पक्षात रामराजे यांना मान आहे. ते निर्णय प्रक्रियेत असतात. त्यामुळे तुम्ही तुतारी वाजवायला किती वेळ लागणार याचा दुसरा अर्थ घेतला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRamraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकरAjit Pawarअजित पवारMahayutiमहायुती