शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम अपहारप्रकरणी आणखी ११ अटकेत

By admin | Updated: August 19, 2015 22:19 IST

७२ लाखांचा घोटाळा : नऊ दिवसांची पोलीस कोठडी

कोरेगाव : कोरेगाव आणि खटाव तालुक्यांतील पाच एटीएम सेंटरमधील मशीनमध्ये पैशांचा भरणा न करता सुमारे ७१ लाख ७५ हजार ७०० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी ११ जणांना कोरेगाव पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली आहे. त्यांना नऊ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. दरम्यान, या गुन्ह्यात यापूर्वी चौघांना अटक करण्यात आलेली असून, ते देखील पोलीस कोठडीत आहेत.बँक आॅफ महाराष्ट्रच्या रहिमतपूर, चिमणगाव, पेठ किन्हई येथील प्रत्येकी एका शाखेत आणि पुसेगाव येथील दोन शाखेतील एटीएम केंद्रांवर पैसे न भरता एकूण ७१ लाख ७५ हजार ७०० रुपयांचा अपहार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर कंपनीचे व्यवस्थापक (ग्राहक सेवा वितरण) अशोक प्रभू (रा. डोंबिवली-कल्याण) यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार सायंटिफिक सिक्युरिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, लि. मुंबईचा सातारा येथील शाखाधिकारी अजय दिलीप हगवणे (रा. पांडेवाडी, पो. भोगाव, ता. वाई) याच्यासह नऊ कर्मचारी आणि त्यांचे सहा साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. सहायक पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे, हवालदार बी. आर. यादव, पोलीस नाईक सनी आवटे यांनी कंपनीचा सातारा शाखेचा व्यवस्थापक अजय हगवणे, वैभव साळुंखे (रा. बोरगाव), अमित यादव (रा. अतीत), अतुल साळुंखे (रा. बोरगाव), शेखर गायकवाड (रा. पांडेवाडी), शशांक यादव (रा. करंजे-सातारा), नामदेव नवघण (रा. वासोळे), निखिल नावडकर (रा. सोनगाव), सागर खरात (रा. आसरे), जितेंद्र शेडगे (रा. बोरगाव), अभिजित बोरस्कर (रा. वडगाव) यांना मंगळवारी रात्री अटक करण्यात आली आहे. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीश सुषमा हिंगसे यांनी नऊ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिले. दरम्यान, याच गुन्ह्यात बुधवार, दि. १२ रोजी तुषार साळुंख (रा. बोरगाव), सचिन जाधव (रा. काशीळ), कुमार ऊर्फ बबलू सकट (रा. बोरगाव हल्ली नागठाणे) आणि विराज ऊर्फ अमोल कुंदप यांना अटक करण्यात आली होती. सहायक पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे तपास करत आहेत. (प्रतिनिधी)