शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
4
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
5
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
6
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
7
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
8
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
9
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
10
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
11
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
12
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
13
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
14
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
15
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
16
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
18
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
19
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
20
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार

अंनिसने पेटवली दुर्गुणांची होळी, खेड गावात उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 12:56 IST

अज्ञान, अविवेक आणि अंधश्रध्दा यांच्याविरोधात कायम लढा देणाऱ्या अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे होळी दिवशी खेड, ता. सातारा येथे दुर्गुणांची होळी पेटवून वेगळा आदर्श घालून दिला.

ठळक मुद्दे अंनिसने पेटवली दुर्गुणांची होळी, खेड गावात उपक्रमडॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या आठवणींना उजाळा

सातारा : अज्ञान, अविवेक आणि अंधश्रध्दा यांच्याविरोधात कायम लढा देणाऱ्या अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे होळी दिवशी खेड, ता. सातारा येथे दुर्गुणांची होळी पेटवून वेगळा आदर्श घालून दिला.चला दुर्गुनांची होळी करुया...विज्ञानाची कास धरुया हा उपक्रम खेड परिसरातील मेकॅनिकल कॉलनी समोरील मैदानावर राबविण्यात आला. अंनिस व खेड ग्रामपंचायतीच्यावतीने कचरा एकत्रित गोळा केला. दुर्गुणांचा प्रतिकात्मक पुतळा तयार करण्यात आला होता. या पुतळ्यावर अंधश्रध्दा, तंबाखू, बुवा-बाजी, भ्रष्टाचार, गुटखा, दारु, विडी सिगारेट, भांग, गांजा, तपकीर आदींचा उल्लेख करण्यात आला होता.ही होळी खेडच्या सरपंच इंदिराताई बोराटे यांच्या हस्ते पेटविण्यात आली. अंनिस बुवाबाजी संघर्ष समितीचे राज्य सदस्य भगवान रणदिवे यांनी तुम्हा डॉ. दाभोलकर.. हे गीत गायले. सर्वांनी कोरस दिला. अंनिसचे राज्य प्रधान सचित प्रशांत पोतदार यांनी विवेकाचा आवाज बुलंद करुया, शहिद डॉ. नरेंद्र दाभोलकर अमर रहे, होळी लहान करु, पोळी दान करु, दुर्गुणांची होळी करु, विज्ञानाची कास धरु अशा घोषणा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंनिसचे सातारा शहर कार्याध्यक्ष अ‍ॅड. हौसेराव धुमाळ यांनी केले. दुर्गुणांची प्रतिमा बनविण्यासाठी दिलीप महादार, केशवराव कदम यांनी परिश्रम घेतले. श्रीनिवास जांभळे, रोहित घाडगे, सूरज साळुंखे, जितेंद्र शिवदास, विजय पवार, वीर पोतदार यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. सुमित भोसले यांनी आभार मानले.

टॅग्स :HoliहोळीSatara areaसातारा परिसर