शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

सातारा-जावळीचा उमेदवार योग्य वेळी जाहीर करु : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 15:33 IST

सातारा-जावळी मतदारसंघातून भाजपचा मीच उमेदवार, असे दीपक पवारांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले असले तरी मात्र ही उमेदवारी कोणाला द्यायची, हे योग्य वेळ आल्यानंतर जाहीर केले जाईल, असे संदिग्ध विधान महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्याने भाजपचे कार्यकर्ते भलत्याच गोंधळात पडले आहेत.

ठळक मुद्देकेवळ संपर्क कार्यालय सुरु करुन मते मिळणार नाहीत संदिग्ध विधानामुळे चर्चेला उधाणसातारा - जावली विधानसभा मतदारसंघ

सातारा : सातारा-जावळी मतदारसंघातून भाजपचा मीच उमेदवार, असे दीपक पवारांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले असले तरी मात्र ही उमेदवारी कोणाला द्यायची, हे योग्य वेळ आल्यानंतर जाहीर केले जाईल, असे संदिग्ध विधान महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्याने भाजपचे कार्यकर्ते भलत्याच गोंधळात पडले आहेत.सातारा - जावली विधानसभा मतदारसंघाच्या जन संपर्क कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माधव भंडारी, रवींद्र अनासपुरे, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जावळीचेनेते दीपक पवार, मनोज घोरपडे, प्रभाकर साबळे, धनंजय जांभळे, मिलिंद काकडे, महेश शिंदे, सिद्धी पवार, प्राची शहाणे, विजय काटवटे, अमित कुलकर्णी, आदी उपस्थित होते.चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, सातारा-जावलीतील जनता शिवेंद्रसिंहराजेच्या विरोधात जनता मतदान करेल, असे नाही. सातारची विधानसभेची जागा भाजपला जिंकायची आहे. सातारा-जावली मतदारसंघाचा उमेदवार कोणदीपक पवार की, अन्य कोण हे योग्य वेळी पक्ष जाहीर करेल.साताऱ्यात जनसंपर्क कार्यालय सुरू करून मते मिळणार नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यात भाजपने गरीब जनतेपर्यंत पोचण्यासाठी सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. तसे उपक्रम साताऱ्यात सुरू केले पाहिजेत तरच जनता भाजपच्या पाठीशी राहील.

जनतेच्या प्रश्नासाठी सुरू केलेले जनसंपर्क कार्यालय २४ तास सुरू राहिले पाहिजे. मी येता- जाता अचानकपणे भेट देईन. त्यावेळी जर जनसंपर्क कार्यालय बंद दिसले तर मग उमेदवारी बाबतीत विचार करावा लागेल असा टोलाकोणाचेही नाव न घेता लगावला.मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढामराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही सरकारची इच्छा आहे. यासाठी सरकारने मागासवर्गीय आयोग नेमला होता. येत्या काही दिवसांत आयोग आपला अहवला न्यायालयात सादर करेल, त्यानंतर आवश्यक ती कायदेशीर लढाई सरकार ताकदीने लढेल, असे आश्वासक विधानही मंत्री पाटील यांनी केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलElectionनिवडणूकBJPभाजपा