ग्रहण धोकादायक नसते, मात्र ग्रहण पाळणे धोकादायक होऊ शकते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 20:35 IST2019-12-26T20:33:37+5:302019-12-26T20:35:23+5:30
सातारा : येथील चार भिंती परिसरात गुरुवारी सकाळी आठ वाजता साताऱ्यातील जिज्ञासू नागरिक व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते ग्रहण ...

साता-यात गुरुवारी पहाटेपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे सातारकरांना सूर्यग्रहणाचा अनुभव घेता आला नाही; पण तरीही अनेकजण चारभिंतीवर ग्रहणाविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेण्यासाठी जमा झाले होते.
सातारा : येथील चार भिंती परिसरात गुरुवारी सकाळी आठ वाजता साताऱ्यातील जिज्ञासू नागरिक व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते ग्रहण पाहण्यासाठी जमले. अंनिस कार्यकर्ते उद्धव शिंगटे यांनी ग्रहताऱ्यांची उपस्थितांना माहिती दिली व शंकांचे निरसन केले.
ग्रहण पाहण्यासाठी दुर्बीण आणण्यात आली होती. मात्र, ढगाळ वातावरणामुळे ग्रहण पाहता आले नाही. परंतु ग्रहताºयांची माहिती ऐकून सर्वजण खूश झाले. ग्रहण काळात सर्वांनी नाष्टाही केला. असा कृतिशील कार्यक्रम सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत सुरू होता.
यावेळी राज्य प्रधान सचिव प्रशांत पोतदार म्हणाले, ‘ज्यावेळी चंद्रामुळे सूर्य अंशत: झाकला जातो, त्याला खंडग्रास सूर्यग्रहण म्हटले जाते. अवकाशातील सूयाभोवती अंधश्रद्धांचा किती वेढा रे. नव्या युगाचे नायक आम्ही. अज्ञानाच्या बेड्या तोडा रे,’ असे आवानही त्यांनी यावेळी केले. ‘ग्रहण म्हणजे खेळ सावल्यांचा. यातून कोणतेही नवीन व धोकादायक किरण निर्माण होत नाहीत. अन्नपाणी दूषित होत नाही. ओठ फाटणे यासारखे गंभीर व्यंग जनुकीय दोषांमुळे व अन्य घटकाच्या कमतरतेमुळे होते. घराची सावली आपल्यावर, झाडाची सावली प्राण्यांच्यावर पडते. अंगावर मच्छर बसतो एवढाच काय बदल. कुठे सूर्य कुठे चंद्र हे सारे सावल्यांचे खेळ आहे; पण माणूस अजब आहे. एकविसाव्या शतकात ग्रहणाविषयी अंधश्रद्धा बाळगतो. बिचाºया गर्भवतीला उपाशीपोटी ठेवून आई आणि बाळाच्या जीवाशी खेळ खेळतो.
आमच्या शिकल्या सवरलेल्या महिलापण हे करताना दिसतात. पुस्तकातले विज्ञान पुस्तकातच राहते. महिलांची वैचारिक जडणघडण फार महत्त्वाची आहे. महिलांनी निर्भय बनले पाहिजे. अघोरी प्रथा सोडून दिल्या पाहिजेत,’ असे मत वंदना माने यांनी व्यक्त केले. यावेळी नीलेश पंडित, शहा पती-पत्नी व साता-यातील नागरिक उपस्थित होते. अंनिस कार्यकर्ते प्रकाश खटावकर यांनी विशेष परिश्रम घेतले. जयप्रकाश जाधव, दशरथ रणदिवे, भगवान रणदिवे पती-पत्नी उपस्थित होते.