शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कपड्यावरील घोषणांतून प्रकटला प्रशासनाचा राग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 22:44 IST

फलटण : साखरवाडी-खामगावच्या सरहद्दीवर काळूबाईनगरमध्ये वर्षापासून अस्वच्छतेचे साम्राज्य... ग्रामस्थ बाळू भाग्यवंत यांनी ग्रामपंचायत, आरोग्य अधिकारी व गटविकास अधिकाºयांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार केला... पण दखल शून्य. दुर्देवाने ग्रामस्थांबरोबर भाग्यवंत यांच्या मुलालाच डेंग्यू झाला. यामुळे निराश पित्याने स्वत:च्या शर्टावर घोषवाक्य लिहून जनजागृती करण्याबरोबरच प्रशासनाचा निषेधही नोंदविला.याबाबत माहिती अशी की, गावातील अस्वच्छतेबाबत बाळू भाग्यवंत ...

फलटण : साखरवाडी-खामगावच्या सरहद्दीवर काळूबाईनगरमध्ये वर्षापासून अस्वच्छतेचे साम्राज्य... ग्रामस्थ बाळू भाग्यवंत यांनी ग्रामपंचायत, आरोग्य अधिकारी व गटविकास अधिकाºयांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार केला... पण दखल शून्य. दुर्देवाने ग्रामस्थांबरोबर भाग्यवंत यांच्या मुलालाच डेंग्यू झाला. यामुळे निराश पित्याने स्वत:च्या शर्टावर घोषवाक्य लिहून जनजागृती करण्याबरोबरच प्रशासनाचा निषेधही नोंदविला.याबाबत माहिती अशी की, गावातील अस्वच्छतेबाबत बाळू भाग्यवंत यांनी वर्षभरापासून गावातील गंभीर परिस्थिती प्रशासनाच्या संबंधित अधिकाºयांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी समक्ष भेटून अर्ज, विनंत्या केल्या; परंतु अधिकारी दाद देत नसल्याचे लक्षात आल्यानंतर काळूबाईनगर परिसरातील घाणीच्या व साठलेल्या पाण्याच्या ठिकाणी विविध प्रकारचे फलक लावले. या परिस्थितीकडे ग्रामस्थ, स्थानिक नेतृत्व आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यात त्याला यश आले नाही.अखेर ही सर्व वस्तुस्थिती मांडणारा एक फलकच त्याने तयार केला असून, तो पाठीवर बांधून खामगाव व साखरवाडी या गावांतून सायकल फेरीद्वारे अगळ्या-वेगळ्या पद्धतीने शासन यंत्रणेचा निषेध करीत ‘धन्य ती लोकशाही’ असे या फलकावर नमूद केले आहे.बाळू भाग्यवंत यांचे काळूबाईनगर येथे इस्त्रीचा व्यवसाय असून, तेथेच त्यांचे वास्तव्य आहे. घराशेजारी एक गुंठा क्षेत्रात पाण्याचे तळे साठले असून, अनेक ठिकाणांहून तेथे पाणी जमा होते. या गटाराच्या बाजूने त्यांनी टीकात्मक परंतु अत्यंत कल्पकतेने फलक लावून जनजागृतीचा प्रयत्न केला.स्वच्छतेचा परिणाम व्हायचा तोच झाला. तालुक्यात डेंग्यूची साथ पसरली अन् ती काळूबाईनगरपर्यंत फोफावली. बाळू भाग्यवंत यांच्या मुलाप्रमाणेच या भागात सुमारे अठरा लोक डेंग्यूने आजारी असल्याचे सांगण्यात येते.यामुळे निराश झालेले भाग्यवंत यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडेही फॅक्सद्वारे हे अर्ज पाठविण्यात आल्याचे सांगून इतके अर्ज पाठविले. समक्ष भेटूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने आता माझ्या मुलालाच डेंग्यू झाला आहे. ‘धन्य खामगाव ग्रामपंचायत आणि धन्य लोकशाही,’ असे या फलकावर नमूद केले आहे. या आंदोलनानं आता तरी प्रशासन जागे होऊन उपाययोजना करते का? याकडे लक्ष लागले आहे.पत्रांची जंत्रीचया फलकावर बाळू भाग्यवंत यांनी गटार तुंबून एक वर्ष झाले. प्रचंड घाण साठली आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी तोंडी सांगून व तक्रार अर्ज करून आपण थकलो असल्याचे नमूद केले आहे.खामगाव ग्रामपंचायतीकडे२० जून २०१७गटविकास अधिकारी १० आॅक्टोबर, १० नोव्हेंबरतालुका आरोग्य अधिकारी १० आॅक्टोबर व १० नोव्हेंबरअर्ज देऊन वस्तुस्थिती निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केल्याचे या फलकावर नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Strikeसंप