शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

अंबवडे गणात सत्ताधाऱ्यांचे पानिपत; काँग्रेसला ‘दे धक्का’

By admin | Updated: August 12, 2015 20:48 IST

अंबवडे (सं) वाघोली, आरबवाडी, रेवडी ग्रामपंचायतीत सत्तांतर

वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील अंबवडे (सं) वाघोली या पंचायत समिती गणातील एकूण सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. काँग्रेसचे विद्यमान पंचायत समिती सदस्य सुरेश सकुंडे यांच्या अंबवडे ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारत सत्ता परिवर्तन केले. या गणात रेवडी, अंबवडे या दोन ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसचे वर्चस्व असतानाही त्यांना या निवडणुकीत हार पत्कारावी लागली.आरबवाडी ग्रामपंचायत राष्ट्रवादी अंतर्गत दोन गटांत रंगतदार झाली. माजी पंचायत समिती सदस्या वंदना भिलारे, राष्ट्रवादीचे नाना भिलारे, संदीप भोसले यांचे वर्चस्व असलेल्या या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे तानाजी गोळे, एल. आर. भोसले यांनी सात ही जागा स्व:ताकडे घेत सत्ताधाऱ्याला धक्का दिला.रेवडी ग्रामपंचायतीची काँग्रेसचे सुनील भोसले यांच्याकडे सत्ता होती. या ग्रामपंचयतीत राष्ट्रवादीने पाच जागा जिंकत परिवर्तन घडवले. राष्ट्रवादीसाठी धनसिंग शिंदे, अरुण मोरे, गजानन मोरे यांनी परिश्रम घेतले.दुधनवाडी ग्रामपंचायतीत पोपट दिघे यांचे वर्चस्व होते. त्यांना राष्ट्रवादीच्याच सुरेश निकम यांनी चार जागा घेऊन शह देत परिवर्तन घडवले आहे.भक्तवडी ग्रामपंचायतीत सात जागांसाठी तिरंगी लढत झाली. यामध्ये सर्वपक्षीय एकत्र येऊन ही निवडणूक लढली गेली.कोलवडी ग्रामपंचायतीत कल्याण भोसले यांनी सत्ता कायम ठेवत सात जागांवर राष्ट्रीवादानेच विजय संपादन केला. तर विरोधी विष्णुपंत भोसले यांना दोन जागा मिळाल्या.अंबवडे (सं) वाघोली ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे विद्यमान पंचायत समिती सदस्य सुरेश सकुंडे यांची सत्ता होती. मात्र, राष्ट्रवादीचे नीलेश जगदाळे व नवनाथ सकुंडे यांनी एकूण नऊ पैकी सात जागावर विजय संपादन करीत सत्तांतर घडवले. तालुक्यातील तांबी ग्रामपंचायतीत मात्र भगवा फडकला. (वार्ताहर)