शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

गादीबरोबरच विचारांचाही वारसा चालवावा, सचिन सावंतांची शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर नाव न घेता टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 15:57 IST

स्थानिक स्वराज संस्था निवडणूक पुढे ढकलली जातेय..

सातारा : ‘राज्य आणि देशही छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालतो. मात्र, छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानादिवशी वाढदिवस साजरा होतो, यासारखी वेदनादायी गोष्ट नाही. त्यांनी गादीबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचाही वारसा चालवावा,’ अशी टीका काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर नाव न घेता केली.सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार परिषदेत सावंत बोलत होते. यावेळी जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण-पाटील, जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, राजेंद्र शेलार, प्रा. विश्वंभर बाबर आदी उपस्थित होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार सातारा जिल्हा काँग्रेसचे निरीक्षक म्हणून प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर प्रथमच साताऱ्यात आल्यानंतर सावंत यांनी जिल्ह्याचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषद घेतली.प्रदेश सरचिटणीस सावंत म्हणाले, काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे तळमळीचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांना महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे. राज्यात आता काँग्रेसच्या मजबूत संघटनासाठी बदलाची प्रक्रिया सुरू झालेली आहे; पण राज्य आणि देशात सुरू झालेले राजकारण हे देशाला अस्ताकडे नेणारे आहे. विरोधी पक्षच संपविण्याचा प्रयत्न होतोय. जाती, धर्मात संघर्ष व्हावा, अशीच भूमिका आहे. देशात ११ वर्षांपासून भाजप सत्तेत असून, लोकशाही वाईट स्थितीत आलेली आहे. यासाठी काँग्रेसला रस्त्यावर उतरून विरोध करावा लागणार आहे. अशावेळी राज्यातील जनतेलाही काँग्रेसला साथ द्यावी लागेल. कारण, विरोधी पक्षच राहिला नाहीतर जनतेच्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडणाराच कोणी राहणार नाही.इतर पक्षांतील नेत्यांची गरजच काय? जगातील मोठा पक्ष म्हणून भाजप सांगते. मग, त्यांना इतर पक्षांतील नेत्यांची गरजच काय? असे सांगून सचिन सावंत पुढे म्हणाले, निवडणुकीतील आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही. लाडक्या बहिणींना २ हजार १०० रुपये दिले नाहीत. महाराष्ट्र तर कर्जात बुडालाय, उद्योग क्षेत्रात पिछेहाट झाली आहे, हे सर्व सोडून औरंगजेबच्या कबरीचा, दिशा सालियान सारखे प्रश्न उपस्थित करून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविले जात आहे. राज्यातील सरकारने १०० दिवसांच्या कार्यक्रमात दंगे आणि विद्वेषाचेच राजकारण केले आहे.

स्थानिक स्वराज संस्था निवडणूक पुढे ढकलली जातेय..या पत्रकार परिषदेत सचिन सावंत यांनी पत्रकारांच्याही विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्ष मजबूत करणार आहे. यासाठी बूथपर्यंत पोहोचणार आहोत. संविधानावरील आक्रमण रोखण्यासाठी लोकांनीही काँग्रेसला साथ द्यावी, असे स्पष्ट केले. तर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या प्रश्नावर सावंत यांनी ही निवडणूक सरकारी वकिलांच्या माध्यमातून पुढे ढकलली जात आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही आवश्यक तेथे एकत्र येणार आहाेत. तरीही काँग्रेस नेतृत्व ठरवेल त्याप्रमाणे निर्णय घेतला जाईल, असे उत्तर दिले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSachin sawantसचिन सावंतcongressकाँग्रेसBJPभाजपाShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसले