शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Satara ZP Election Results 2026: भाजपचे ‘स्वबळा’चे मनसुबे उधळले, सत्तेसाठी ‘राष्ट्रवादी-शिंदेसेना’ एकत्र?

By हणमंत पाटील | Updated: February 10, 2026 17:42 IST

नेत्यांना अतिआत्मविश्वास नडला

हणमंत पाटीलसातारा : जिल्हा परिषदेच्या एकूण ६५ पैकी स्वबळावर सत्तेसाठी किमान ३३ जागा जिंकण्याची रणनीती भाजपच्या नेत्यांनी आखली होती. त्यानुसार सर्वाधिक ६१ जागा लढविल्यानंतरही त्यांना केवळ २७ जागांवर यश मिळाले. भाजपचा ‘स्वबळा’वर सत्तेसाठीचा ‘विजयाचा वारू’ रोखण्यात मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला (अजित पवार गट) आणि शिंदेसेनेला यश आले. राष्ट्रवादी २० आणि शिंदेसेना १५ असे एकत्र आल्यास सत्तेसाठीच्या ३५ जागांचा जादुई आकडा होऊ शकतो.सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळण्यात २०२४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीपासून सुरुवात झाली. सातारा लोकसभा आणि आठपैकी निम्म्या जागांवर भाजपला मोठे यश मिळाले. त्यानंतर डिसेंबर २०२५ ला झालेल्या जिल्ह्यातील ९ पैकी ६ नगरपालिका व एका नगरपंचायतीवर भाजपने झेंडा फडकविला. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपच्या विजयाचा वारू आता जिल्हा परिषदेत पण सत्ता स्थापन करणार, असा अतिआत्मविश्वास भाजपच्या नेत्यांच्या भाषणातून दिसून आला.त्यांनी मित्र पक्षातील शिंदेसेनेचे नेते व पालकमंत्री शंभूराज देसाई, तसेच राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते मकरंद पाटील यांना टार्गेट केले. मित्रपक्षाचे नेते व उमेदवारांना हालक्यात घेऊन आरोपप्रत्यारोपांची झोड उठविली. मात्र, सातारकरांना ही भाजपच्या नेत्यांची ही जहरी टीकाटिप्पणी रुचली नाही. त्यामुळे मतदारांनी भाजपचे एकहाती सत्तेचे मनसुबे उधळून लावल्याचे निकालावरून दिसून आले.

दोन्ही राष्ट्रवादीच्या ‘अंडरस्टॅडिंग’चा फायदा...गतपंचावार्षिक निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या सत्तेत निर्विवाद असलेल्या राष्ट्रवादीत २०२२ साली फूट पडली. राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे गट वेगवेगळे झाले. त्यामुळे जिल्हा परिषदेचा गड राखण्याचे त्यांच्यापुढे अवघड आव्हान आहे, हे राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी वेळीच ओळखले. त्यामुळे सबुरीने घेत दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ‘अंडरस्टॅडिंग’चा प्रयोग या निवडणुकीत जिल्हाभर केला. ‘जिल्ह्यातील ज्या गटात ‘घड्याळ’ चिन्हाचा उमेदवार आहे, त्याठिकाणी ‘तुतारी’चा उमेदवार दिला नाही.’ शिवाय निवडणूक प्रचाराच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. या सहानुभूतीचा फायदा राष्ट्रवादी अजित पवार गटाला झाल्याचे निकालावरून दिसून आले.

राजकीय पक्ष - लढविलेल्या जागा -विजयी

  • भाजप : ६१ - २७
  • राष्ट्रवादी (अ.प) - ३६ - २०
  • शिंदेसेना - ३१ - १५
  • कॉंग्रेस - ०८ - ०१
  • उद्धवसेना - १४ - ००
  • राष्ट्रवादी(श.प.) - १० - ००
  • स्वाभिमानी - ०२ - ०१
  • अपक्ष - २२ - ०१
English
हिंदी सारांश
Web Title : Satara ZP: BJP's solo dreams dashed; NCP-Shinde Sena may unite?

Web Summary : BJP failed to win Satara ZP independently. NCP and Shinde Sena alliance can reach majority. Internal understanding of both NCP factions helped.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६Satara areaसातारा परिसरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे