शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

कऱ्हाडच्या ‘बचत भवना’त मद्यपींच्या डुलक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 00:59 IST

कऱ्हाड : यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीतील कºहाडमध्ये जिल्हा परिषदेच्यामार्फत बचतभवन यशंवतराव चव्हाण सभागृह बांधण्यात आलेले आहे. या सभागृह इमारतीची ...

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : पत्त्यांच्या खेळांचे होतायत डावसभागृह इमारत दुरवस्थेमुळे बैठकांचे प्रमाण झाले कमी

कऱ्हाड : यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीतील कºहाडमध्ये जिल्हा परिषदेच्यामार्फत बचतभवन यशंवतराव चव्हाण सभागृह बांधण्यात आलेले आहे. या सभागृह इमारतीची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहेच; शिवाय परिसर सध्या रात्रीच्यावेळी मद्यपीच्या पार्ट्या होत आहेत. तर दुपारच्यावेळी डुलक्या.

कऱ्हाड येथील दैत्यनिवारणी मंदिर परिसरात जिल्हा परिषदेच्या सेस तसेच पंचायत समितीच्या अल्पबचत सानुगृह अनुदानातून भव्य अशी सभागृहाची इमारत आणि पदाधिकाऱ्यांच्या विश्रामगृहाची सध्या दुरवस्था झाली आहे. महिन्यातून दोन किंवा तीनदा कर्मचाºयांसाठी होणाºया बैठका व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी येथील यशवंतराव चव्हाण सभागृहाचा वापर केला जातो. बैठकाव्यातरिक्त तसेच पडून असलेल्या या सभागृहाच्या इमारतीची तसेच शौचालय इमारतीस मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत. २५ नोव्हेंबर १९८८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या सभागृह इमारतीस नुकतीच अठ्ठावीस वर्षे पूर्ण झाली आहेत. सध्या या इमारतीच्या भिंतींना ठिकठिकाणी तडे गेलेले आहेत. तर शौचालय इमारत ही असून अडचण नसून खोळंबा, अशी झाली आहे.

शासकीय मालमत्तेवर भरमसाठ खर्च करून त्यांचा प्रमाणापेक्षा जास्त वापर केला जातो. मात्र, जेव्हा त्या डागडुजीसाठी निघतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. ही गोष्ट शासकीय विभागात नवी नाही. शासकीय काम आणि बारा महिने थांब, अशीच परिस्थिती या ठिकाणी पाहावयास मिळत आहेत. सभागृहाच्या झालेल्या दुरवस्थेबाबत येथील पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी नेहमीच वरिष्ठ अधिकाºयांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. तत्कालीन गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांनीही जिल्हा परिषदेकडे सभागृहाच्या दुरुस्तीबाबत निधीची मागणी केली होती.

डागडुजीच्या प्रतीक्षेत असलेल्या या इमारत परिसरात दिवसा कोणी फारसे फिरकत नसल्याने दुपारच्यावेळी परिसरातील पत्ते खेळणाºयांचे डाव अन् मद्यपी डुलक्या घेत आहेत. तर रात्रीच्यावेळी पार्ट्या होत आहेत. परिसरात आढळणाºया दारूच्या मोठ्या प्रमाणातील मोकळ्या बाटल्या आणि पत्त्यांच्या पानांचे ढीग हे याचे पुरावे देतात.

वास्तविक पाहता शासकीय कार्यालय परिसरात धूम्रपान तसेच कोणत्याही अंमली पदार्थांचे सेवन करू नये, असा नियम आहे. मात्र, या ठिकाणी तर शासकीय विश्रांतीगृह अन् सभागृह आवारातच असे रात्रंदिवस प्रकार घडत असल्याने दोष कोणाला द्यायचा? असा प्रश्न निर्माण होत आहे. वरिष्ठ अधिकारी तसेच येथील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे आज या सभागृहाची व परिसरातील अशी दयनीय अवस्था झाली आहे.शरद पवारांच्या हस्ते झाले होते उद्घाटनशासनाच्या अल्पबचत सानुगृह अनुदानातून कºहाड येथील जुन्या कोयना पुलानजीक बांधण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण सभागृहास नुकतीच अठ्ठावीस वर्षे पूर्ण झाली आहेत. २५ नोव्हेंबर १९८८ मध्ये बांधलेल्या सभागृहाचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले होते.फक्त एकदाच डागडुजीसन १९८८ मध्ये बांधण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण सभागृहाची आतापर्यंत २०१० मध्ये फक्त एकदाच डागडुजी करण्यात आली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून दहा लाख रुपये खर्चातून इमारतीची दुरुस्ती व रंगकाम करण्यात आले. त्यानंतर आजतागायत डागडुजी करण्यात आली नाही.फक्त मिटिंगपुरतेच सभागृह खुले !सातारा जिल्हा परिषदेच्यामार्फत कºहाड येथे जिल्हा परिषद पदाधिकारी व पंचायत समिती पदाधिकाºयांचे, विविध विभागांचे सांस्कृतिक कार्यक्रम व बैठका घेण्यासाठी स्वतंत्र सभागृह बांधण्यात आले आहे. हे सभागृह मिटिंग व बैठकांपुरतेच खुले केले जाते. इतरवेळी बंद ठेवले जाते. या सभागृहाची नियमित स्वच्छता केली जात नसल्याने येथील साहित्यांचीही दुरवस्था झाली आहे.सुरक्षिततेची ऐशीच्या तैशीशासकीय कार्यालये, सभागृह यांचे संरक्षण करण्यासाठी सुरक्षारक्षकाची नेमणूक शासनाच्या वतीने केली जाते. मात्र, कऱ्हाड  येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विश्रामगृह व बचतभवन येथील सभागृह परिसरातील सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षक आहेत का? असा प्रश्न या ठिकाणी आल्यावर पाहायला मिळतो. कारण याठिकाणी सुरक्षाभिंती असो व सभागृहाच्या खिडक्यांच्या काचा, शौचालये यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे.कºहाड येथील दैत्यनिवारणी मंदिर परिसरात जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृह बचत भवन परिसरात मद्यपी दुपारच्या वेळी डुलक्या घेत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरGovernmentसरकार