शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

अक्षदाच्या धाडसामुळे अनेकांच्या घरातून दूर झाला अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 00:00 IST

वीज म्हटलं की खरंतर अंगावर काटा उभा राहतो, मग ती आकाशात कडाडणारी असो किंवा आपल्या रोजच्या वापरातील असो. सर्वसामान्य नागरिक विजेच्या खांबाखाली उभं राहताना देखील घाबरतो; पण अशा विजेच्या खांबावर, ३० फूट उंचीवर लीलया चढून काम करणारी तरुणी पाहिली की तोंडात बोट जातात.

ठळक मुद्देविजेच्या खांबावर चढून जोडल्या तारा, दापवडीची मुलगी बनली जावळी तालुक्यात चर्चेचा विषय

आनंद गाडगीळ ।मेढा : गेल्या काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यात मुरळधार पाऊस पडला. यात जावळी तालुक्यातील वीज खांब वाकले होते. तर काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने अनेक गावांमधील वीज गेल्याने अंधार पडला होता. महावितरण कंपनीपुढे वीजपुरवठा सुरळीत करण्याचे मोठे आव्हान होते. अशावेळी दापवडी येथील अक्षदा रांजणे ही ३० फूट उंच खांबावर चढून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करीत होती. तिची जिद्द आणि धाडसीपणा पाहून सध्या चर्चेचा विषय बनली आहे.वीज म्हटलं की खरंतर अंगावर काटा उभा राहतो, मग ती आकाशात कडाडणारी असो किंवा आपल्या रोजच्या वापरातील असो. सर्वसामान्य नागरिक विजेच्या खांबाखाली उभं राहताना देखील घाबरतो; पण अशा विजेच्या खांबावर, ३० फूट उंचीवर लीलया चढून काम करणारी तरुणी पाहिली की तोंडात बोट जातात. जावळी तालुक्यातील दापवडी गावची अक्षदा नथुराम रांजणे ही युवती सध्या जावळी तालुक्यात चर्चेचा विषय बनली आहे.

वीजवितरण कंपनीच्या करहर शाखेत काम वीजतंत्री म्हणून काम करणाºया अक्षदा हिचे धाडस हे महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत हेच दाखवते. वीजवितरण कंपनीत आज अनेक महिला नोकरी करताहेत; पण ते काम चार भिंतीच्या आतील; मात्र प्रत्यक्ष फिल्ड वर्क करताना, वायरमन म्हणून काम करताना महिला दिसणं हे मात्र कठीणच. मात्र, अक्षदा रांजणे मागील तीन वर्षांपासून खांबावर चढून वीज दुरुस्तीचे काम करीत आहे. अतिवृष्टीच्या काळामध्ये तिने जलदगतीने खांबांची दुरुस्ती करून अनेकांच्या घरातील अंधार दूर केला.शेतकरी कुटुंबात जन्मलेली अक्षदा हिने घरचे काम, शेतीचे काम करीत शिक्षण पूर्ण केले. २०१८ मध्ये वीज वितरण कंपनीच्या करहर शाखेत तिने शिकाऊ उमेदवार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर ती काम करीत असताना आॅफिसमधील कामात तिचे मन रमेना, तिने सहकारी वायरमन यांच्याबरोबर फिल्डवर जाण्यास सुरुवात केली. खांबावर चढून दुरुस्ती करण्याचे काम केल्याने तिचातील आत्मविश्वास दुणावला अन् ३० फूट उंचीवर लीलया चढून ती काम करू लागली.लहानपणापासून मला आयुष्यात काहीतरी वेगळं व चांगलं करायचं ठरवलं होते. ज्या क्षेत्रात महिला काम करायला घाबरतात, अशा क्षेत्रात मला काम करण्याची संधी मिळाली. त्यासाठी सुरुवातीपासून आई, वडील, भाऊ, आयटीआयमधील शिक्षकांच्या मार्गदर्शनाबरोबरच कार्यालयातील अधिकारी, सहकारी यांचे देखील प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे सध्या महावितरणमध्ये करीत असलेल्या वीजतंत्री कामामुळे एक वेगळाच समाधान मिळत आहे.-अक्षदा रांजणे,वीजतंत्री महावितरणजावली तालुक्यात दापवडी येथील अक्षदा रांजणे महावितरणा च्या ३० फुटी उंच खांबावर लिलया चढून दुरुस्तीची कामे पाहते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmahavitaranमहावितरण