अजित पवारांच्या सूचना : बेशिस्त खपवून घेणार नाही

By Admin | Updated: November 23, 2014 23:57 IST2014-11-23T22:44:41+5:302014-11-23T23:57:11+5:30

चुकीच्या गोष्टींबाबत जाब विचारा़ लोकांच्या हिताचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी रस्त्यावर उतरा़,’

Ajit Pawar's suggestions: Will not tolerate untimely status | अजित पवारांच्या सूचना : बेशिस्त खपवून घेणार नाही

अजित पवारांच्या सूचना : बेशिस्त खपवून घेणार नाही

कऱ्हाड : ‘केंद्रात अन् राज्यात आपण कुठेच सत्तेत नाही़ त्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे़ कुणाच्या आदेशाची वाट पाहू नका. चुकीच्या गोष्टींबाबत जाब विचारा़ लोकांच्या हिताचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी रस्त्यावर उतरा़,’ अशा सूचना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी राष्ट्रवादीच्या आमदारांसह कार्यकर्त्यांना दिल्या़
कऱ्हाड येथे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित आमदारांचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकाऱ्यांचा सत्कार पवार यांच्या हस्ते झाला़यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी मजबूत आहेच; पण ती अधिक मजबूत करा़ लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आपल्या गावात काय घडलंय-बिघडलंय याचा अभ्यास करा़ उगाच खुर्च्या अडवून बसू नका. जमिनीवर पाय ठेवून कामाला लागा़ पक्षात बेशिस्त अजिबात खपवून घेतली जाणार नाही.’ (प्रतिनिधी)
(संबंधित वृत्त हॅलो १ वर)


काँग्रेस, भाजपवर टीका
माजी मुख्यमंत्र्यांच्या कऱ्हाडमध्ये राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार अजित पवारांच्या हस्ते होत असताना ते राजकीय वक्तव्ये करतील, ही अपेक्षा अजित पवारांनी
खरी ठरविली.
‘विरोधात असताना बोलणं सोपं असतं,’ असे म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारने फिरविलेल्या शब्दांचा समाचार घेतला. तसेच सरकारला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस राष्ट्रवादीला बदनाम करीत आहे, असेही
ते म्हणाले.

Web Title: Ajit Pawar's suggestions: Will not tolerate untimely status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.