शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 23:03 IST

Ajit Pawar: कराडात दिवंगत 'यशवंतरावां'ना अभिवादन, साताऱ्यात मेळाव्याला मार्गदर्शन

प्रमोद सुकरे, कराडनजीकच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच 'मिनी विधानसभे'च्या निवडणूका होवू घातलेल्या आहेत. या निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांची राष्ट्रवादी कामाला लागली आहे. त्याची सुरूवात गुरूवारपासून (२२ मे) साताऱ्यातील मेळाव्यातून होत आहे. पण, तत्पूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ,महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर हे कराड येथे दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी म्हणजेच राष्ट्रवादीच्या शक्ती स्थळी अभिवादन करून रणशिंग फुंकणार आहेत. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी (२२ मे) साताऱ्यात पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. 

त्या पार्श्वभूमी बुधवारी रात्रीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर कराड मुक्कामी आहेत.गुरुवारी सकाळी कराडच्या प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करून ते मिनी विधानसभेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत.

वाचा >>पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?

त्यानंतर सर्व मान्यवर विरंगुळा निवासस्थानी भेट देणार आहेत. त्यानंतर १० वाजता साताऱ्यातील पोवई नाक्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात होणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

राष्ट्रवादीने घेतली आघाडी

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्यसभा खासदार नितीन पाटील, आमदार सचिन पाटील, राष्ट्रवादीचे सातारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचा राज्यातील पहिलाच पदाधिकारी, कार्यकर्ता मेळावा साताऱ्यात होत आहे. यानिमित्तानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वात आधी राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतल्याचे बोलले जात आहे.

स्मृतिस्थळ राष्ट्रवादीचे प्रेरणास्थळ

 दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे कराड येथील स्मृतिस्थळ हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे स्मृतिस्थळ राहिले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार महायुतीत सहभागी झाले. त्यानंतर सर्वप्रथम प्रीतिसंगमावर येऊन अजित पवारांनी यशवंतरावांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केले होते.तर ज्येष्ठ नेते शरद पवारांनीही याच स्मृतिस्थळी अभिवादन करून महाराष्ट्राचा दौरा सुरू केला होता.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक 2024Karadकराडsunil tatkareसुनील तटकरे