शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अजित पवारांवर भरवसा नाय म्हणत सोबत किती जाणार याचीच चर्चा

By दीपक शिंदे | Updated: April 19, 2023 14:37 IST

कार्यकर्त्यांच्या मनात अजित पवारांबाबत एक अनामिक भीती कायम

दीपक शिंदे सातारा: राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडींमुळे मंगळवार सकाळपासूनच अनेकांची धावपळ उडाली. कोण कुठे आहे आणि कोण कुणाच्या संपर्कात आहे. आपले आमदार कुठे आहेत. आता काय करायचं, अशा एक ना अनेक शंकांनी सर्वांची मने कावरीबावरी झाली होती. प्रत्येकजण फोन करून आमदार साहेब कुठे आहेत, याची माहिती घेत होते. फोन लागत नाही म्हणून अस्वस्थ होत होते. स्वीय सहायकांचे फोन बंद येत होते आणि नेते नॉट रिचेबल होते. त्यामुळे काही का होईना पण मनात शंकेची पाल चुकचुकत होती. अजित पवारांचं काही खरं नसतं. असे सांगत त्यांच्यावर भरवसा ठेवायला अनेकांचं मनच धजावत नव्हतं. जिल्ह्यातून सोबत गेले तर एक आमदार मकरंद पाटील आणि दुसरे रामराजे नाईक निंबाळकर हे दोघेच जातील, इथपर्यंत येऊन चर्चा थांबत होती.राष्ट्रवादीचे नेते अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडणार आणि भाजपमध्ये जाऊन मुख्यमंत्री होणार, याची चर्चा आज दिवसभर शहरातील गल्लीपासून गावातील पारापर्यंत रंगली होती. अजित पवार राष्ट्रवादी सोडून जाणार नाहीत, असे त्यांनी स्वत: सांगितले असले तरी त्यांच्यावर भरवसा ठेवायला अनेकांचे मन धजावेना. ते कधीही बेधडक निर्णय घेऊ शकतात, असे कार्यकर्तेच खासगीत बोलू लागलेत. फक्त त्यांच्यासोबत किती आमदार जाणार याचीच चर्चा आहे. काहींच्या अंदाजानुसार ३०, तर काहींचा अंदाज अगदी ४५ पर्यंत पोहचलाय.

रामराजेंचे स्टेटस विधान परिषदेचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर हे बऱ्याचदा आपली भूमिका स्टेटसच्या माध्यमातून जाहीर करत असतात. आपल्याला जे काही सांगायचे आहे. ते स्टेटस ठेवले की कळते. कोणी फोन केला तरी स्टेटस पाहिले का, असा प्रश्न विचारला जातो. स्टेटस न दिसल्याने त्यांची भूमिका कार्यकर्त्यांना कळू शकली नाही. त्यामुळ कुछ तो बात है, असे अनेकांना वाटून गेले.

आमदार मकरंद पाटील नॉट रिचेबलवाई - महाबळेश्वर - खंडाळा या विस्तीर्ण मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील हे राष्ट्रवादीचे झंझावाती नेतृत्व. जिल्ह्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत त्यांची दररोज मजल असते. त्यामुळे त्यांचा फोन कधी लागतो, तर कधी लागत नाही. त्यांचा फोन मंगळवारी लागत नसल्याने कार्यकर्ते दिवसभर अस्वस्थ होते. अनेकांनी एकमेकांना फोन करून आबा कुठे आहेत, याची विचारपूस करत आपल्या आमदारांचा ठावठिकाणा जाणून घेतला.

बाळासाहेब पाटील कार्यक्रम आणि इफ्तार पार्टीतराष्ट्रवादीचे जिल्ह्यातील दुसरे प्रबळ नेते आणि माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे मतदारसंघात विविध कार्यक्रम सुरू होते. ते कार्यकर्त्यांमध्ये असल्यामुळे कार्यकर्त्यांना काहीच भीती राहिली नव्हती. आपले आमदार अजून मतदारसंघातच आहेत. त्यांना बहुतेक वरून फोन आलेला दिसत नाही, अशी माहिती देत कार्यकर्त्यांनी एकमेकांना दिलासा दिला, तर बुधवारी इफ्तार पार्टी असल्याने त्या दिवसाचीही शंका कोणाच्या मनात राहिली नाही.

खासदार साहेबांच्या वाट्याला कोणी गेलेच नाहीखासदार श्रीनिवास पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची मैत्री जगजाहीर आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल शंका घेण्यास कोणालाच वाव नाही. जे काही पक्ष नेतृत्व ठरवेल त्याप्रमाणेच त्यांची भूमिका असणार हे निश्चित. त्यामुळे ते कुठे आहेत आणि कोणासोबत आहेत, असे विचारण्याचे धाडसही कोणी करत नाही हे विशेष.

हाय तर हाय अन नाय तर नायअजित पवार यांचा बाणा रोखठोक आहे. एखादी गोष्टी होणार असेल तर होय आणि होणार नसेल तर नाही म्हणून लगेच कंडका पाडतात. हे झाले इतरांच्या कामाबाबत. पण स्वत:च्या बाबतीत ते कोणताही धक्कादायक निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांच्या मनात अजित पवारांबाबत एक अनामिक भीती कायम आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस