निरा येथील ज्युबिलीयन्ट कंपनीत वायु गळती-चाळीस जणांना श्वसनाचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 11:19 AM2019-04-18T11:19:08+5:302019-04-18T11:20:43+5:30

निरा येथील ज्यूबिलीएन्ट लाईफ सायन्स लि. कंपनीमध्ये बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास ‘अन हायड्रेड’ या विषारी वायू गॅस गळतीमुळे चाळीस कामरांना श्वसनाचा त्रास होऊ लागला

Air leakage in the Jubilee Company of Nair-40 people with respiratory troubles | निरा येथील ज्युबिलीयन्ट कंपनीत वायु गळती-चाळीस जणांना श्वसनाचा त्रास

निरा येथील ज्युबिलीयन्ट कंपनीत वायु गळती-चाळीस जणांना श्वसनाचा त्रास

Next
ठळक मुद्देखबरदारी म्हणून परिसर खाली

लोणंद : निरा येथील ज्यूबिलीएन्ट लाईफ सायन्स लि. कंपनीमध्ये बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास ‘अन हायड्रेड’ या विषारी वायू गॅस गळतीमुळे चाळीस कामरांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना निरा लोणंद येथील वेगवेगळ्या रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर वैद्यकीय अधिकाºयांच्या देखरेकीखाली उपचार सुरू आहेत. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून परिसर खाली करण्यात आला आहे.

निरा येथे ज्यूबिलीएन्ट लाईफ सायन्स लि. या कंपनीचा केमिकल इंटर मेडिएटस प्लॅन्ट आहे. या ठिकाणी अ‍ॅसिटीक अनहायट्रेड अ‍ॅसिड, इथलॉन अ‍ॅसिटीट व एक्स्ट्रा नॅचरल अल्कहोलची निर्मिती केली जाते. बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास या परिसरात काम करणाºया कामगारांना या विषारी वायू गळतीमुळे श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानंतर एकच धावपळ उडाली. यामधील सोळा जनांना निरा येथील एका खासगी  हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे.

लोणंद येथील खासगी हॉस्पिटलमध्ये बारा रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. यामध्ये रमेश काकडे, नाना यादव, संजय ढवळे, आखिलेश कुमार, प्रमोद बापट, मल्हारी घुखे, मयुर कदम, संजय कदम, लक्ष्मण तोडकर, विनोद चौगुले, सुनिल गुरव असून दुसºया खासगी हॉस्पिटलमध्ये अविनाश सूर्यवंशी, शाम नाईक, अक्षय राजे, हनुमंत पाणेळे तर अन्य एका हास्पीटलमध्ये अमोल गायकवाड, लखन गायकवाड, दत्तात्रय  गायकवाड, सुनिल शिंदे उपचार घेत असून यामधील एकास रात्री पुण्याला हलविण्यात येणार आहे.

रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता ...
खबदरीचा उपाय म्हणून या ठिकाणाचा सर्व परिसर खाली करण्यात आला आहे. अ‍ॅसिटीक आहायट्रेज हा विषारी वायू डोळे, नाक यांच्याद्वारे फुफ्फुसात गेल्यामुळे दम लागतो. डोळे व नाकाच्या अंतरत्वचेचा दाह होणे, डोळे लाल होतात. वेळीच उपचार न मिळाल्यास रूग्ण दगाऊ शकतो, अशी माहिती लोणंद येथील डॉ. डोंबाळे यांनी दिली.

Web Title: Air leakage in the Jubilee Company of Nair-40 people with respiratory troubles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.