शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
2
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
3
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
6
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
7
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
8
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
9
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
10
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
11
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
12
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
13
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
14
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
15
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
16
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
17
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
18
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
19
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
20
बाल्कनीतून कबुतरांना हटवण्याचा सर्वात सोपा अन् प्रभावी उपाय; समस्येतून मिळेल कायमचा तोडगा
Daily Top 2Weekly Top 5

वय वर्षे चाळीस; पण आम्ही लग्नाळू..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:42 IST

कराड : कायद्यानं विवाहयोग्य वय ठरवून दिलंय. पंचविशीत तरी मुलाच्या डोक्यावर अक्षदा पडाव्यात, असे सामाजिक संकेतही आहेत; पण सध्या ...

कराड : कायद्यानं विवाहयोग्य वय ठरवून दिलंय. पंचविशीत तरी मुलाच्या डोक्यावर अक्षदा पडाव्यात, असे सामाजिक संकेतही आहेत; पण सध्या चाळीशी गाठली तरी मुलाचे हात पिवळे होईनात. पूर्वी वधू पित्याला मुलीच्या विवाहाचं ‘टेन्शन’ असायचं; पण सध्या पोरगं वयात आलं की पित्याची धाकधूक वाढतेय. कसं जमवायचं आणि कुठं जमवायचं, हाच प्रश्न वरपित्याला सतावतोय.

मुलीचं अठरा तर मुलाचं वय एकवीस वर्ष झालं की ते विवाहयोग्य असल्याचे कायदा सांगतो. मुलींच्या तुलनेत मुलांच्यात सज्ञानपणा उशिराने येतो. त्यामुळे विवाहात मुलीपेक्षा मुलाचं वय जास्त असावं, असं सांगितलं जातं. त्याला काही शास्त्रीय कारणेही आहेत; मात्र सध्या वेगवेगळ्या कारणास्तव मुलांची लग्नं रखडल्याचे दिसून येते. पूर्वी विवाह जमविणे वडीलधाऱ्यांच्या हातात होते. युवक-युवतींना विवाहाबाबत फारसे स्वातंत्र्य नव्हते; मात्र बदलत्या जमान्यात मुला-मुलींच्या पसंतीला महत्त्व आले. त्यांना पटत असेल तरच वडीलधाऱ्यांकडून पुढील बोलणी होतात. त्यातच सध्या शिक्षणाशिवाय पर्याय उरलेला नाही. पदवीपर्यंतचे शिक्षण करिअरसाठी पुरेसे ठरत नाही. त्यामुळे विवाहातही उच्च शिक्षणाला प्राधान्य दिले जाते. उच्च शिक्षण, मोठ्या कंपनीत नोकरी या मुलींच्या प्रमुख अपेक्षा असतात. या पहिल्याच अपेक्षेत अनेक युवक नापास होतात. त्यातच ग्रामीण भागात राहण्यास अनेक युवती तयार होत नाहीत. शहरात फ्लॅट असावा, असेही युवतींचे म्हणणे असते. त्यामुळे ग्रामीण भागातल्या युवकांना वधू शोधताना सुरुवातीलाच ‘फ्लॅट’ची अपेक्षा नसलेली युवती शोधावी लागते.

- चौकट

‘ग्रामीण’ अडकले; ‘शहरी’ही रखडले

१) ग्रामीण भागातल्या शेतकरी युवकांची विवाहासाठी दैना उडत असताना शहरी भागातील युवकांची परिस्थितीही याहून वेगळी राहिलेली नाही.

२) उच्च शिक्षण, चांगली नोकरी, शहरात फ्लॅट असूनही अनेक युवकांचे विवाह रखडले आहेत.

३) शहरी कुटुंबांकडे बहुतांशवेळा शेतजमीन नसते. त्यामुळे वधूच्या अपेक्षा पूर्ण होत असल्या तरी वधूपित्याची जमिनीची अपेक्षा असते.

४) सद्यस्थितीत प्रत्येक गावात वयाची ३० शी ओलांडलेल्या अनेक युवकांचे पालक मुलासाठी वधूच्या शोधात असल्याचे दिसते.

- चौकट

एकतर ‘चौकोनी’, नाहीतर ‘दोघेच’

विवाह रखडलेल्या युवकांमध्ये एकत्रित कुटुंबातील युवकांचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. बहुतांश युवतींमध्ये एकत्रित कुटुंबाविषयीची आस्था कमी झाली आहे. सासू, सासरे आणि आम्ही दोघे अशा ‘चौकोनी’ कुटुंबाला युवतींकडून पसंती दिली जाते. त्याचबरोबर ‘शहरात फ्लॅट आणि दोघेच’ असा ‘ट्रेंड’ही रुजू होतोय. त्यामुळे एकत्रित कुटुंबातील मुलांची लग्ने जमविताना अडचणी येत आहेत.

- चौकट

शेतकरी नवरा.. नको गं बाई..!

शेती आणि त्यावर अवलंबून असणारं कुटुंब, याला अपवाद वगळता वधू किंवा तिच्या पित्याकडूनही फारसं महत्त्व दिलं जात नाही. मुलगी नोकरी करणारा असावा, अशी बहुतांश वधूपित्यांची इच्छा असते. तसेच शेतीतील कष्टाची कामे करण्यास सध्या युवक आणि युवतीही धजावत नाहीत. त्यामुळे बहुतांश शेतकरी मुलांचे विवाह रखडल्याचे दिसते.

- चौकट

विवाह रखडण्याची कारणे आणि प्रमाण

८ टक्के : एकत्रित कुटुंब

१२ टक्के : ग्रामीण भागात राहतो

१४ टक्के : कार, फ्लॅट, बंगला नाही

२३ टक्के : नोकरी आहे; पण जमीन नाही

४२ टक्के : मुलगा शेतकरी

लोगो : नवरी मिळेना नवऱ्याला - १

फोटो : २६केआरडी०३, ०४

कॅप्शन : प्रतीकात्मक