राड्यानंतर दोन्ही राजे उपमुख्यमंत्री फडणवीसांबरोबर कराडमध्ये एकत्र

By प्रमोद सुकरे | Updated: June 22, 2023 12:20 IST2023-06-22T12:19:09+5:302023-06-22T12:20:28+5:30

फडणवीस काय मध्यस्थी करणार का? याबाबत कार्यकर्त्यांच्यात उत्सुकता

After the dispute, both the kings together with Deputy Chief Minister Devendra Fadnavis in Karad | राड्यानंतर दोन्ही राजे उपमुख्यमंत्री फडणवीसांबरोबर कराडमध्ये एकत्र

राड्यानंतर दोन्ही राजे उपमुख्यमंत्री फडणवीसांबरोबर कराडमध्ये एकत्र

कराड : बुधवारी सातारात बाजार समितीच्या जागेवरून आमनेसामने आलेले सातारचे दोन्ही राजे गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात व भाजप कोअर कमेटिच्या बैठकीत एकत्रित आले. बैठकीत राजेंमधील वादावर नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकले नाही.

सातारा येथे बुधवारी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले समर्थकांसह आमने सामने आले.दोन्ही गटाच्या समर्थकांच्यात धक्का बुक्की झाली.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यादिवशीच भाजप मध्ये हा राडा झाला. त्यामुळे याबाबत फडणवीस काय मध्यस्थी करणार का? याबाबत कार्यकर्त्यांच्यात उत्सुकता आहे.

दरम्यान कराड येथे मुक्कामी आलेल्या फडणवीसांना भेटायला सातारचे दोन्ही राजे गुरुवारी सकाळीच पोहोचले होते.त्यांनी एकत्रित नाष्टाही घेतला म्हणे.त्यानंतर सकाळी ११ वाजता कोअर कमेटीची बैठक सुरु झाली. त्यालाही हे दोन्ही राजे उपस्थित होते. आता या दोघांना फडणवीस यांनी नेमका काय सल्ला दिला तो पहावा लागेल.

Web Title: After the dispute, both the kings together with Deputy Chief Minister Devendra Fadnavis in Karad