शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
4
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
6
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
7
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
8
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
9
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
10
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
11
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
12
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
13
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
14
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
15
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
16
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
17
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
18
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
19
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
20
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या

Satara: नीरा उजवा कालवा अस्तरीकरणातील तडवळेचा काँक्रीट प्लांट हलविणे सुरु, शेतकऱ्यांच्या संघर्षाला यश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 13:58 IST

खासगी कंपनीने गुंडाळला गाशा

फलटण : नीरा उजवा कालवा अस्तरीकरण विरोधी समितीच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संघर्षाला अखेर प्राथमिक यश मिळाले आहे. अस्तरीकरणासाठी नियुक्त खासगी कंपनीने तडवळे हद्दीत उभारलेला आरएमसी रेडीमिक्स काँक्रीट प्लांट हलवण्याची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू झाली आहे. सध्या प्लांटवरील साहित्य, यंत्रसामग्री गोळा करून ती हटवण्याचे काम सुरू आहे.मागील दोन वर्षांपासून नीरा उजवा कालवा अस्तरीकरणाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. याला बळकटी देण्यासाठी २२ ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन या प्रकल्पास ठाम विरोध करणारे ठराव मंजूर केले होते. कालव्याच्या अस्तरीकरणामुळे पाण्याचा झिरपण्याचा नैसर्गिक मार्ग बंद होईल, कालव्यालगतच्या विहिरी आणि बोअरवेल्स कोरड्या पडतील, परिणामी शेतीला गंभीर फटका बसेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे होते.

ट्रॅक्टर मोर्चा अन् निवेदनेया लढ्यात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. हजारो शेतकरी, महिला या मोर्चात सहभागी झाले होते. फलटण येथे तत्कालीन प्रांताधिकारी सचिन ढोले आणि जलसंपदा विभागाचे उप अभियंता यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिले. निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले होते की, अस्तरीकरण झाल्यास विहिरी व कूपनलिका बंद पडतील. त्याचे परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागणार आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अस्तरीकरण करू देणार नाही.

  • बावीस ग्रामपंचायतींचा अस्तरीकरणाच्याविरोधात ठराव.
  • हजारो शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा
  • अस्तरीकरणामुळे विहिरी व बोअरवेल्स कोरड्या पडण्याची भीती.
  • आरएमसी प्लांट हटवण्याची सुरुवात, काम थांबवले.

हा केवळ प्राथमिक विजय आहे. अंतिम यश तेव्हाच मान्य केले जाईल जेव्हा शासन हा प्रकल्प पूर्णतः रद्द करेल. कालव्याची पारंपरिक मातीची व मुरमाची रचना कायम ठेवण्याचा निर्णय घेईल. - अमोल खराडे, शेतकरी तडवळे