शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

प्रत्येक फेरीनंतर विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंदी भाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:13 AM

सातारा : येथील औद्योगिक वसाहतीतील वखार महामंडळाच्या गोदामात सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. प्रत्येक फेरीनिहाय राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ...

सातारा : येथील औद्योगिक वसाहतीतील वखार महामंडळाच्या गोदामात सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. प्रत्येक फेरीनिहाय राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व खासदार उदयनराजे भोसले यांचे मताधिक्य वाढत होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या चेहºयावर सतत आनंदी भाव दिसून येत होते.पहिल्या फेरीनंतर...सकाळी आठनंतर इव्हीएमद्वारे झालेल्या मतमोजणीस सुरूवात झाली. या पहिल्या फेरीचा निकाल नऊनंतर समोर आला. या फेरीत खासदार उदयनराजे भोसले यांनी मताधिक्य घेतल्याचे दिसून आले. उदयनराजेंना २९ हजार ८९६ तर विरोध शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना २१ हजार ५८१ मते मिळाली. तर नोटाला ४१७ मतदारांनी पसंती दिली. या फेरीत नरेंद्र पाटील यांना सातारा विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळाल्याचे दिसून आले. तर उर्वरित मतदारसंघात उदयनराजे पुढे होते.दुसºया फेरीनंतर...मतमोजणीच्या दुसºया फेरीचाही निकाल दहानंतर जाहीर करण्यात आला. या फेरीत उदयनराजे यांना २८ हजार ६५५ तर नरेंद्र पाटील यांना २३ हजार ४५० मते प्राप्त झाली. या फेरीत उदयनराजे हे वाई, कोरेगाव, कºहाड उत्तर मतदारसंघात पुढे असल्याचे दिसले. तर नरेंद्र पाटील हे कºहाड दक्षिण, पाटण आणि सातारा विधानसभा मतदारसंघात पुढे राहिले. या फेरीत इतर उमेदवारांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे सहदेव ऐवळे यांनाच सर्वाधिक २१८१ मते मिळाली.पाचव्या फेरीनंतर...पहिल्या फेरीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांचे मताधिक्य वाढत होते. त्यामुळे पाचव्या फेरीत उदयनराजे भोसले यांचे मताधिक्य किती वाढते याकडे सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले. या फेरीत उदयनराजे यांना ३० हजार २६० मते मिळाली. तर शिवेसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना २३ हजार २३६ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सहदेव ऐवळेंना २२११ मते प्राप्त झाली. या फेरीत ५७ हजार ९६६ मतांची मोजणी करण्यात आली. तर या फेरीत नोटाला ५१६ मते मिळाली. या फेरीतही उदयनराजेंना वाई, कोरेगाव, कºहाड उत्तर, कºहाड दक्षिण आणि सातारा विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळाले. तर नरेंद्र पाटील यांना पाटण मतदारसंघात अधिक मते मिळाली.आठव्या फेरीनंतर...आठव्या फेरीला दुपारच्या सुमारास सुरूवात झाली. या फेरीत अपेक्षेप्रमाणे उदयनराजे यांनीच मताधिक्य मिळवले. उदयनराजेंना ३२ हजार ८५ तर नरेंद्र पाटील यांना २२ हजार ४२९ मते मिळाली. नोटाला ४३९ मतदारांनी कौल दिला. या फेरीत वाई, कोरेगाव, कºहाड उत्तर, कºहाड दक्षिण आणि सातारा विधानसभा मतदारसंघाने मताधिक्य दिले. तर नरेंद्र पाटील यांना पाटण विधानसभा मतदारसंघात अधिक मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे सहदेव ऐवळे यांना २२६१ मते मिळाली.दहाव्या फेरीनंतर...मतमोजणीच्या दहाव्या फेरीत उदयनराजे भोसले यांना ३१ हजार ५८९ तर नरेंद्र पाटील यांना २५ हजार ८४५ मते मिळाली. या खालोखाल सहदेव ऐवळे यांना २१०६, सागर भिसे ४९४, पंजाबराव पाटील ४४३, आनंद थोरवडे ३८४, दिलीप जगताप २९२, शैलेंद्र वीर २९१ तर अभिजित बिचुकले यांना ११७ मते प्राप्त झाली. तर नोटाला ४३४ मतदारांचा कौल मिळाला. या फेरीत नरेंद्र पाटील यांनी वाई आणि पाटण विधानसभा मतदारसंघात उदयनराजेंच्या विरोधात मताधिक्य मिळवले.पंधराव्या फेरीनंतर..मतमोजणीच्या पंधराव्या फेरीत उदयनराजे हे नरेंद्र पाटील यांच्या पुढे होते. उदयनराजेंना ३१ हजार ३०८ तर नरेंद्र पाटील यांना २५ हजार ५२८ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सहदेव ऐवळे यांना २३७२ मते प्राप्त झाली तर नोटाला ५१३ मते मिळाली. या फेरीत ऐकूण ६१ हजार ५९३ मतांची मोजणी करण्यात आली. उदयनराजेंना वाई, कोरेगाव, कºहाड उत्तर, सातारा विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळाले. तसेच नरेंद्र पाटील यांना कºहाड दक्षिण आणि पाटण मतदारसंघात अधिक मते मिळाली.विसाव्या फेरीनंतर..मतमोजणीच्या विसाव्या फेरीतही उदयनराजे हेच पुढे होते. या फेरीत उदयनराजेंना १२ हजार ३५८, नरेंद्र पाटील यांना ८ हजार २९४ मते मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सहदेव ऐवळे यांना ६४१ मते प्राप्त झाली. उदयनराजेंना वाई, पाटण आणि सातारा विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळाले.