पतीचे ‘चॅटिंग’ सापडल्याने विचारला जाब, पत्नीला मारहाण; पतीसह सासूवरही पोलिसांत गुन्हा

By दत्ता यादव | Updated: January 16, 2023 15:55 IST2023-01-16T15:53:05+5:302023-01-16T15:55:46+5:30

सातारा शहरात वास्तव्यास असणारी पीडित विवाहिता ही २५ वर्षांची आहे.

After discovering the 'chatting' of the husband the wife was beaten in satara | पतीचे ‘चॅटिंग’ सापडल्याने विचारला जाब, पत्नीला मारहाण; पतीसह सासूवरही पोलिसांत गुन्हा

पतीचे ‘चॅटिंग’ सापडल्याने विचारला जाब, पत्नीला मारहाण; पतीसह सासूवरही पोलिसांत गुन्हा

सातारा - पतीने दुसऱ्या महिलेसोबत चॅटिंग केल्याचे पत्नीला सापडल्याने संतप्त झालेल्या पत्नीने याचा जाब विचारताच पतीने तिला मारहाण केली. ही घटना साताऱ्यात घडली असून, याप्रकरणी पीडित विवाहितेने सातारा शहर पोलिस ठाण्यात पती, सासूविरोधात तक्रार दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा शहरात वास्तव्यास असणारी पीडित विवाहिता ही २५ वर्षांची आहे. तिच्या पतीने दुसऱ्या एका महिलेसोबत मोबाइलवर चॅटिंग केल्याचे पत्नीला सापडले. यामुळे संतप्त झालेल्या पत्नीने याचा पतीला जाब विचारला असता उलट पतीने तिलाच मारहाण केली. एवढेच नव्हे तर शिळे जेवण खायला घालून जुने कपडे घालायला लावून मानसिक व शारीरिक छळ केला. या प्रकारानंतर पीडित महिलेने सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन पती आणि सासूविरोधात गुन्हा दाखल केला. याबाबत हवालदार इंगवले हे अधिक तपास करीत आहेत.
 

Web Title: After discovering the 'chatting' of the husband the wife was beaten in satara